Award for Shrinath Bhimale | श्रीनाथ भिमाले, प्राची दुधाणे यांना छत्रपती शाहूजी महाराज पुरस्काराने सन्मानित करणार!

HomeBreaking News

Award for Shrinath Bhimale | श्रीनाथ भिमाले, प्राची दुधाणे यांना छत्रपती शाहूजी महाराज पुरस्काराने सन्मानित करणार!

Ganesh Kumar Mule Jun 23, 2026 7:25 PM

Pune Property Tax | मिळकतकर भरण्यासाठी नागरी सुविधा केंद्र सुट्टी दिवशी देखील सुरु राहणार | महापालिका मिळकत कर विभागाची माहिती 
Katraj Kondhwa Road Action | कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरणासाठी महापालिकेची धडक कारवाई
PMC JE Exam Results | कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) परीक्षा निकाल आचारसंहितेमुळे रखडला | मनपाने जिल्हाधिकाऱ्यांकडे मागितले मार्गदर्शन

Award for Shrinath Bhimale | श्रीनाथ भिमाले, प्राची दुधाणे यांना छत्रपती शाहूजी महाराज पुरस्काराने सन्मानित करणार!

 

Pune News  -(The Karbhari News Service) – फुले-शाहू-आंबेडकर विचारमंचतर्फे यंदाचा छत्रपती शाहूजी महाराज पुरस्कार पुणे महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले आणि सामाजिक कार्यकर्त्या प्राची दुधाणे यांना प्रदान करण्यात येणार आहे.

हा पुरस्कार वितरण सोहळा गुरुवार २५ जून २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.

ज्येष्ठ विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण होणार असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रमाई महोत्सवाचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर असणार आहेत.

या सोहळ्याला उपमहापौर परशुराम वाडेकर आणि रमाई महोत्सवाचे कार्याध्यक्ष सचिन ईटकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

फुले-शाहू-आंबेडकर विचारमंचाच्या वतीने सामाजिक, शैक्षणिक आणि सार्वजनिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो.

कार्यक्रमाची माहिती मुख्य समन्वयक विठ्ठल गायकवाड यांनी निवेदनाद्वारे दिली.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: