PMC JE Recruitment 2025 | पुणे महापालिकेत अभियंता होण्याची संधी | उद्यापासून अर्ज करा | १६९ पदांसाठी जाहिरात आली!
PMC Junior Engineer Recuritment – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) होण्याची संधी आली आहे. महापालिकेने १६९ पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार उमेदवार १ ऑक्टोबर म्हणजे उद्यापासून ते ३१ ऑक्टोबर पर्यंत अर्ज करू शकतात. अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे. (Pune Mahanagarpalika JE Bharti 2025)
पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील श्रेणी ‘क’ मधील तांत्रिक संवर्गातील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदासाठीची रिक्त पदे सरळसेवा भरती प्रक्रियेद्वारे भरण्यासाठी प्रस्तुत जाहिरातीत नमूद केलेप्रमाणे शैक्षणिक अर्हता व इतर बाबींची पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून https://www.pmc.gov.in/b/recruitment या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
ही देखील बातमी वाचा : PMC JE Bharti 2024 | पुणे महापालिकेत कनिष्ठ अभियंता (JE Civil) होण्याची संधी | अखेर जाहिरात आली!
ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी वेळापत्रक
१ ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचे दिनांक – १/१०/२०२५
२ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक – ३१/१०/२०२५, वेळ २३:५९ पर्यंत
३ ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरणेची अंतिम मुदत – १/१०/२०२५ ते ३१/१०/२०२५
४ परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक – परीक्षेच्या ७ दिवस आधी
५ ऑनलाईन परीक्षेचा दिनांक – यथावकाश घोषित केली जाईल
परीक्षेचा दिनांक, वेळ व केंद्र प्रवेशपत्रामध्ये नमूद केले जाईल. संभाव्य बदला बाबत वेळोवेळी पुणे महानगरपालिका संकेत स्थळावर माहिती प्रसारित केली जाईल.
ही देखील बातमी वाचा : PMC Junior Engineer Recruitment | पुणे महापालिकेत कनिष्ठ अभियंता भरती | १६९ पदांसाठी लवकरच जाहिरात प्रसिद्ध होणार!
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (श्रेणी – ३) उपलब्ध पदे व पद संख्या –
एकूण पदे – १६९
अजा – १६
अज – १९
विजा अ – २
भज – (ब) – ४
भज (क) – ५
भज (ड) – ३
विमाप्र – ४
इमाव – ३७
एसीईबीसी – १७
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक – १८
अराखीव – ४४
वेतनश्रेणी – ७ व्या वेतन आयोगा प्रमाणे – S १४ – ३८६०० ते १२२८००
पात्रता – मान्यता प्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पूर्णवेळ पदवी किंवा पदविका उत्तीर्ण असणे आवश्यक.
दरम्यान या आधी जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर ज्या उमेदवारांनी अर्ज केले होते, अशा २७८७९ उमेदवारांपैकी वय मर्यादा उलटून गेलेल्या उमेदवारांना देखील अर्ज करण्यास मुभा देण्याचे निर्देश राज्य सरकारच्या वतीने देण्यात आले आहेत. त्यामुळे या उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. कारण या सर्व उमेदवारांचे अर्ज ग्राह्य धरले जाणार आहेत. शिवाय या सर्व उमेदवारांना त्यांच्या जातीचा प्रवर्ग सुधारित करण्याची देखील संधी देण्यात आली होती. त्यानुसार सामाजिक किंवा समांतर आरक्षणाचा प्रवर्ग बदलण्याच्या संधीचा ४४१९ उमेदवारांनी लॉग इन करून लाभ घेतला आहे.
अभियंता पदासाठीची सविस्तर जाहिरात येथे पहा

COMMENTS