Pune Road Potholes | दिवाळीच्या दिवसात पुणेकरांना खड्ड्यात घालू नका | रस्ते खोदाईची कामे थांबवण्याची मागणी
Pune PMC News – (The Karbhari News Service) – दिवाळीच्या खरेदीसाठी संपूर्ण शहरात गर्दी होत आहे, त्यामुळे रस्ते खोदाईच्या कामांना या काळात स्थगिती द्यावी, अशी मागणी माजी आमदार, प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी महापालिका आयुक्तांकडे आज (शुक्रवारी) केली. (Mohan Joshi Pune Congress)
नियोजित सायकल स्पर्धेचा ट्रॅक करण्यासाठी आणि सीसीटीव्ही ची केबल टाकण्यासाठी रस्ते खोदाईची कामे करण्यात येणार आहेत. काही ठिकाणी ही कामे चालू आहेत. सीसीटीव्ही च्या केबलसाठी सुमारे २८ किलोमीटर रस्ता खोदला जाणार आहे. हे काम आवश्यकच आहे. पण, सध्या सणासुदीच्या दिवसांतील वाढत्या रहदारीमुळे रस्त्यांवर वाहतूक कोंडी होते. त्यात रस्ते खोदाईमुळे भरच पडणार आहे. त्यामुळे रस्त्यांची कामे तूर्त स्थगित ठेवावीत. सणाच्या काळात पुणेकरांना खड्ड्यातून चालायला लावू नये.
प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी आणि माजी मंत्री रमेश बागवे यांच्या नेतृत्वाखाली आयुक्तांना भेटलेल्या शिष्टमंडळात सुनिल मलके, अविनाश बागवे, प्रथमेश आबनावे, मुख्तार शेख, आयुब पठाण, चेतन आगरवाल, प्रशांत सुरसे, गौरव बोराडे, सुरेश कांबळे, ॲड. प्रविण करपे, ॲड.साहिल राऊत, विनोद रणपिसे, मिलिंद पोकळे, अमोल धर्मावत, ॲड.विजय त्रिकोणे, विकास सुपनार, मेधशाम धर्मावत, सुनिल बावकर, हुसेन शेख, दयानंद आडागळे, गोपाळ धनगर आदी सहभागी होते.

COMMENTS