PMC JE Bharti Results | महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) भरती प्रक्रियेत छेडछाड नाही | नावातील साम्यावर प्रशासनाचा खुलासा

Homeadministrative

PMC JE Bharti Results | महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) भरती प्रक्रियेत छेडछाड नाही | नावातील साम्यावर प्रशासनाचा खुलासा

Ganesh Kumar Mule Jun 18, 2026 12:11 PM

Prmaod Nana Bhangire on PMC JE Exam | पुणे महानगरपालिकेतील कनिष्ठ अभियंता पदाची संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करून फेरपरीक्षा घ्या — प्रमोद नाना भानगिरे
PMC JE Bharti | कनिष्ठ अभियंता भरती : पेपर फुटीचा आरोप पुणे महापालिकेने फेटाळला | १६९ पैकी १४६ पात्र उमेदवारांना दिली नियुक्तीपत्रे! 
PMC JE Recruitment 2025 | पुणे महापालिकेत अभियंता होण्याची संधी | उद्यापासून अर्ज करा | १६९ पदांसाठी जाहिरात आली 

PMC JE Bharti Results | महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) भरती प्रक्रियेत छेडछाड नाही | नावातील साम्यावर प्रशासनाचा खुलासा

 

PMC JE Recruitment 2026 – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदाच्या भरती प्रक्रियेत कोणतीही छेडछाड झालेली नाही, असा खुलासा महापालिका प्रशासनाने केला आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी उपस्थित केलेल्या आरोपांवर प्रशासनाने सविस्तर माहिती दिली आहे. ही नावे दुबार नसून समान नावाचे १४ उमेदवार आहेत, असा खुलासा अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर यांनी बुधवारी केला. (Prajit Nair IAS)

कुंभार यांनी भरतीच्या निकालात एकाच नावाच्या २६ उमेदवारांचा उल्लेख असल्याचा दावा केला होता. यावर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर यांनी स्पष्ट केले की, संबंधित उमेदवारांची नावे, वडिलांचे नाव आणि आडनाव समान असले तरी इतर सर्व तपशील वेगवेगळे आहेत.

‘उमेदवार यादीत २६ नव्हे, तर २८ नावे आहेत. त्यातील १४ नावे समान असली तरी ते वेगवेगळे उमेदवार आहेत. त्यांची पडताळणी करण्यात आली आहे. परीक्षेची तारीख एकच असली, तरी त्यांचा पत्ता व परीक्षा केंद्रे वेगवेगळ्या शहरांत होती.’

महापालिकेने भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने राबवली असल्याचा दावा केला असून, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 1
  • comment-avatar
    Ashish 3 months ago

    एवढी पारदर्शक प्रक्रिया असेल तर २०२२ मध्ये दिल्याप्रमाणे IBPS च्या स्टँडर्ड फॉरमॅटमध्ये निकाल का देण्यात आला नाही? IBPS मार्फत घेतल्या जाणाऱ्या इतर सर्व परीक्षांचे निकाल स्टँडर्ड फॉरमॅटमध्येच प्रसिद्ध केले जातात. मग PMC ने IBPS च्या स्टँडर्ड फॉरमॅटमध्ये निकाल का दिला नाही?

DISQUS: