PMC Health Committee | पुणे महानगरपालिकेत स्वतंत्र “आरोग्य समिती” स्थापन करण्याच्या मागणीला गती

Homeadministrative

PMC Health Committee | पुणे महानगरपालिकेत स्वतंत्र “आरोग्य समिती” स्थापन करण्याच्या मागणीला गती

Ganesh Kumar Mule Jun 18, 2026 7:21 PM

NCP-SP On Sonam Wangchuk | सोनम वांगचुक व अभिजित दीपके यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार) चे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन
Omprakash Divate PMC | जनगणना 2027 च्या घरयादी कामाला वेग नाही; मनपा अतिरिक्त आयुक्तांनी दिला कडक इशारा
Ajit Pawar Met Baba Adhav | EVM घोटाळा झाल्याचं सिद्ध करुन दाखवण्याचं अजित पवारांनी दिले चॅलेंज

PMC Health Committee | पुणे महानगरपालिकेत स्वतंत्र “आरोग्य समिती” स्थापन करण्याच्या मागणीला गती

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) –  पुणे शहरातील वाढत्या आरोग्यविषयक गरजा आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला अधिक सक्षम, परिणामकारक व उत्तरदायी बनविण्याच्या उद्देशाने पुणे महानगरपालिकेत स्वतंत्र “आरोग्य समिती” स्थापन करण्याची मागणी जोर धरत आहे. (Suhas Tingre NCP)

८ जून रोजी नगरसेवक तथा पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे सदस्य सुहास टिंगरे यांनी पुणे महानगरपालिकेत स्वतंत्र “आरोग्य समिती” स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण ठराव मांडला होता.

या ठरावाच्या अनुषंगाने काल झालेल्या पुणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत मा. सुहास टिंगरे यांनी हा विषय पुन्हा उपस्थित करून शहरासाठी स्वतंत्र आरोग्य समितीची आवश्यकता अधोरेखित केली.

यावेळी महापौर मंजुषा नागपुरे यांनी या विषयाची गांभीर्याने दखल घेत स्वतंत्र “आरोग्य समिती” लवकरात लवकर स्थापन करण्याबाबत प्रशासनाला आवश्यक सूचना दिल्या.

पुणे शहराची वाढती लोकसंख्या, वेगाने होणारे नागरीकरण, संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजारांचे वाढते प्रमाण, महापालिकेची रुग्णालये, दवाखाने, प्रसूतिगृहे, लसीकरण मोहीम, सार्वजनिक आरोग्य, स्वच्छता आणि नागरिकांच्या आरोग्यविषयक वाढत्या समस्या लक्षात घेता आरोग्य क्षेत्राकडे स्वतंत्रपणे व अधिक प्रभावीपणे लक्ष देणे ही काळाची गरज बनली आहे.

सध्या महापालिकेमध्ये विविध विषय समित्या कार्यरत असल्या तरी सार्वजनिक आरोग्यविषयक बाबींचा सखोल अभ्यास, नियोजन, देखरेख आणि धोरणात्मक निर्णय प्रक्रियेसाठी स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध नाही. त्यामुळे आरोग्यविषयक कामकाज अधिक परिणामकारक, समन्वयपूर्ण आणि नागरिकाभिमुख पद्धतीने राबविण्यासाठी स्वतंत्र “आरोग्य समिती” स्थापन करणे आवश्यक असल्याचे मा. टिंगरे यांनी स्पष्ट केले.

स्वतंत्र “आरोग्य समिती” स्थापन झाल्यास महापालिकेचे आरोग्यविषयक कामकाज अधिक पारदर्शक, उत्तरदायी आणि कार्यक्षम होईल. तसेच पुणेकरांना अधिक सक्षम, दर्जेदार आणि सुलभ आरोग्य सेवा उपलब्ध होण्यास मदत होईल.

याबाबत सुहास टिंगरे म्हणाले, “निरोगी पुणे हेच आपल्या शहराच्या विकासाचे खरे बळ आहे. भविष्यातील आरोग्यविषयक आव्हानांना सक्षमपणे सामोरे जाण्यासाठी स्वतंत्र आरोग्य समिती ही काळाची गरज असून, या माध्यमातून पुणेकरांना अधिक प्रभावी आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे शक्य होईल.”

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: