Property Tax | मिळकतकर विभागाने घडविला इतिहास | विविध अडचणींवर मात करत वर्षभरात 1965 कोटींचे उत्पन्न

HomeपुणेBreaking News

Property Tax | मिळकतकर विभागाने घडविला इतिहास | विविध अडचणींवर मात करत वर्षभरात 1965 कोटींचे उत्पन्न

Ganesh Kumar Mule Mar 31, 2023 2:44 PM

PT 3 Form | Pune Property Tax | PT-3 अर्ज भरून देण्याची मुदत 30 नोव्हेंबर पर्यंत | पुणेकरांना दिलासा
Pune Property Tax | PT-3 application deadline is 30th November | Relief for Pune residents
PMC PT 3 Form | Pune Property Tax | PT-3 अर्ज भरून देण्याचा उद्याचा शेवटचा दिवस | मिळकत करातून महापालिकेला 1630 कोटींचे उत्पन्न प्राप्त

मिळकतकर विभागाने घडविला इतिहास | विविध अडचणींवर मात करत वर्षभरात 1965 कोटींचे उत्पन्न

| मागील वर्षी पेक्षा 125 कोटींचे मिळवले अधिक उत्पन्न!

 | मागील वर्षी मिळाले होते 1840 कोटी

पुणे |  विविध अडचणींवर मात करत मिळकतकर विभागाने (PMC property tax department) आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये सुमारे 1965 कोटींचे उत्पन्न मिळवले आहे. मागील वर्षी पेक्षा हे उत्पन्न 125 कोटींनी अधिक आहे. मागील वर्षी पालिकेला 1840 कोटी मिळाले होते. यावर्षी मिळालेले उत्पन्न हे आतापर्यंतच्या इतिहासात सर्वात जास्त आहे. अशी माहिती मिळकतकर विभागाचे प्रमुख अजित देशमुख (Deputy commissioner Ajit Deshmukh) यांनी दिली.
 पुणे महापालिकेच्या मिळकतकर विभागाने आजच्या दिवशी म्हणजे आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी 42 कोटींचा मिळकतकर वसूल केला आहे. मागील वर्षी याच दिवशी 39 कोटी मिळाले होते. एकूणच आर्थिक वर्षात मिळकतकर विभागाने 1965 कोटींचे उत्पन्न प्राप्त केले आहे. मागील वर्षी 1840 कोटी मिळाले होते. विशेष म्हणजे मागील वर्षी अभय योजना दोनदा राबवण्यात आली होती. तीनपट कराचा मुद्दा, 40% सवलतीचा मुद्दा मागील वर्षी नव्हता. असे असतानाही मागील वर्षीपेक्षा सुमारे 125 कोटी अधिक उत्पन्न विभागाने मिळवले आहे. (PMC Pune)
| 65 हजार मिळकतींचे मूल्यमापन 
मिळकतकर विभागाने पहिल्यापासूनच वसुलीवर जोर दिला होता. त्यामुळे विभागाला 1900 कोटींचा टप्पा पार करता आला आहे. तसेच नवीन मिळकतीचे मूल्यमापन करण्यावर देखील विभागाकडून जोर देण्यात आला होता. वर्षभरात 65 हजार मिळकतीचे मूल्यमापन करण्यात आले. ज्यातुन महापालिकेला 400 कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. विभागाला 2022-23 मध्ये 2200 कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले होते. तर 2023-24 मध्ये 2618 कोटी उत्पन्न जमा करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. आगामी वर्षात देखील 2200 कोटीपेक्षा अधिक उत्पन्न मिळेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. (Pune Municipal Corporation)
—-