Khadakwasla Dam Water | खडकवासला समूहात ४.१३ टीएमसी पाणी साठा | पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

Homeadministrative

Khadakwasla Dam Water | खडकवासला समूहात ४.१३ टीएमसी पाणी साठा | पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

Ganesh Kumar Mule Jun 18, 2026 8:10 PM

Pune Grand Tour 2027 Season 2 |  सायकल स्पर्धा 26 ते 31 जानेवारी दरम्यान पुणे जिल्ह्यात रंगणार
Sant Tukaram Maharaj Paduka | जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुकांची शासकीय महापूजा
Tukaram Maharaj Bij | इंद्रायणी नदीचे पाणी पिण्याकरीता वापरण्यास मनाई  | श्री तुकाराम महाराज बीज सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मनाई आदेश लागू

Khadakwasla Dam Water | खडकवासला समूहात ४.१३ टीएमसी पाणी साठा | पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

 

Pune News – (The Karbhari News Service)  – पुणे शहर आणि परिसरासाठी महत्त्वाच्या खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर धरण समूहात सध्या ४.१३ टीएमसी आणि पवना धरणात १.६५ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. हा साठा ३१ ऑगस्टपर्यंत पुरेल अशा पद्धतीने काटेकोरपणे व्यवस्थापन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत. (Jitendra Dudi IAS)

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत पर्जन्यमान, धरणातील साठा आणि पाणीवापराचा आढावा घेताना डुडी बोलत होते. यावेळी पुणे पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता प्रवीण कोल्हे, अधीक्षक अभियंता पृथ्वीराज फाळके यांच्यासह महसूल, जलसंपदा व इतर विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

३१ ऑगस्टपर्यंतचे नियोजन
खडकवासला समूहाची जिवंत साठवण क्षमता २९.१५ टीएमसी आहे. सध्या ४.१३ टीएमसी साठा उपलब्ध आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगर क्षेत्रासाठी ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत अनुक्रमे ४ टीएमसी आणि १.५ टीएमसी पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन नियोजन करावे, असे डुडी यांनी सांगितले.

पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका, नगरपरिषदा, ग्रामपंचायती, एमजेपी, एमआयडीसी आणि इतर संस्थांनी उपलब्ध साठा आणि आगामी गरजेनुसार पाणी वापराचे पुनर्नियोजन करावे, अशा सूचना देण्यात आल्या.

बेकायदेशीर उपशावर कारवाई
धरणे, कालवे, नद्या आणि इतर जलस्रोतांमधून होणारा अनधिकृत पाणी उपसा रोखण्यासाठी महसूल, पोलीस आणि जलसंपदा विभागाच्या संयुक्त पथकांमार्फत विशेष तपासणी मोहीम राबवण्याचे आदेश देण्यात आले. अनधिकृत मोटारी, पाईपलाईन आणि पंपांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कठोर कारवाई करण्याच्या सूचना महसूल यंत्रणेला देण्यात आल्या.

सर्व संबंधित विभागांनी जलसाठा, पर्जन्यमान, पाण्याची आवक आणि वापराचा साप्ताहिक आढावा घेऊन अहवाल जिल्हा प्रशासनाला सादर करावा, असेही सांगण्यात आले.

उपयुक्त साठ्यात मोठी तूट
पुणे विभागात सध्या उपयुक्त जलसाठा ७ टीएमसी म्हणजेच १४.३० टक्के आहे. गेल्या वर्षी याच काळात १६९.९ टीएमसी म्हणजेच ३१.१६ टक्के साठा होता. त्यामुळे यंदा सुमारे ९०.९ टीएमसीची तूट आहे, अशी माहिती अधीक्षक अभियंता प्रवीण कोल्हे यांनी दिली.

जिल्हा प्रशासनाने पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देत राखीव साठा संरक्षित ठेवण्याचे आणि परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्याचे स्पष्ट केले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: