PMC Ward 2 on Smart Meter | स्मार्ट मीटर सक्तीविरोधात प्रभाग दोन मधील नागरिकांचा एल्गार

HomeBreaking News

PMC Ward 2 on Smart Meter | स्मार्ट मीटर सक्तीविरोधात प्रभाग दोन मधील नागरिकांचा एल्गार

Ganesh Kumar Mule Jun 17, 2026 9:01 PM

Chief Justice of India |  सरन्‍यायाधीशांवर हल्‍ला करणाऱ्यावर देशद्रोहाचा गुन्‍हा दाखल करा – प्रभाग दोन मध्ये सर्व पक्षीय निषेध आंदोलन
PMC Ward No 2 | प्रभाग दोनच्या नागरी प्रश्नावर अधिकारी ‘ऑन चार्ज’
PMC Ward 2 | विद्यार्थ्यांना मिळणार आधुनिक, तंत्रज्ञानावर आधारित शिक्षणाचे धडे – प्रभाग क्रमांक दोन मधील सरस्वती प्राथमिक विद्यालयात कलादालन आणि डिजिटल लॅबचे उद्घाटन

PMC Ward 2 on Smart Meter | स्मार्ट मीटर सक्तीविरोधात प्रभाग दोन मधील नागरिकांचा एल्गार

– समतानगरातील आंदोलनात दोन हजारांहून अधिक नागरिकांसह स्थानिक लोकप्रतिनिधींचा सहभाग

 

Pune Breaking News – (The Karbhari News Service) – स्मार्ट मीटरच्या सक्तीविरोधात प्रभाग क्रमांक 2 मधील नागरिकांनी मंगळवारी समतानगर येथील लुंबिनी उद्यानात मोठे जनआंदोलन छेडले. सकाळी साडे दहा वाजता झालेल्या या आंदोलनात दोन हजारांहून अधिक नागरिक सहभागी झाले होते. स्मार्ट मीटरमुळे वाढत्या वीज बिलांचा फटका सामान्य ग्राहकांना बसत असल्याचा आरोप करत नागरिकांनी महावितरणच्या धोरणाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. (Pune News)

आंदोलनाची दखल घेत महावितरणच्या कल्याणीनगर शाखेचे अधिकारी दीपक पाटील यांनी त्यांच्या प्रतिनिधी म्हणून कनिष्ठ अभियंत्यांना आंदोलनस्थळी पाठवले. यावेळी नागरिकांकडून स्मार्ट मीटर नको असल्याचे दोन हजारांहून अधिक लेखी अर्ज तसेच प्रभागातील नगरसेविका नंदिनी सिद्धार्थ धेंडे, शितल सावंत आणि नगरसेवक सुहास टिंगरे व रवी टिंगरे यांची निवेदने महावितरणकडे सादर करण्यात आली. या वेळी माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे उपस्थित होते.

महावितरणच्या अधिकाऱ्यांनी प्रभाग क्रमांक 2 मध्ये नागरिकांवर स्मार्ट मीटरची सक्ती केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले. तसेच स्मार्ट मीटर किंवा वीज बिलांबाबतच्या तक्रारींचे तातडीने निवारण करण्यात येईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

या आंदोलनाचे नेतृत्व नगरसेविका नंदिनी सिद्धार्थ धेंडे,. शितल सावंत, नगरसेवक सुहास टिंगरे, रवी टिंगरे, समाजसेवक अजय सावंत तसेच माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी केले.

यावेळी नागरिकांनी “महावितरणची मनमानी बंद करा”, “स्मार्ट मीटरची सक्ती नको”, “अवाजवी वीज बिलांना आळा घाला” अशा घोषणा देत आपला संताप व्यक्त केला.

यापूर्वी पाणी कपातीच्या प्रश्नावर यशस्वी आंदोलन करून प्रशासनाला निर्णय मागे घ्यावा लागला होता. त्यानंतर आता वीज बिलांच्या प्रश्नावरही नागरिक एकवटल्याने प्रशासनाने या मागण्यांची गंभीर दखल घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. प्रभाग क्रमांक 2 मधील नागरिकांची एकजूट आणि लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्यामुळे स्मार्ट मीटर सक्तीविरोधातील हे आंदोलन यशस्वी ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

या वेळी महावितरणच्या नगर रोड कल्याणी नगर , येरवडा, शास्त्रीनगर विभागाचे संजय मलपे, आतिश शिंदे, शेळके उपस्थित होते. या वेळी मलपे म्हणाले की, नागरिकांच्या भावना पाहता दिलेली निवेदने वरिष्ठांना पाठविणार आहोत. तसेच नागरिकांचा स्मार्ट मीटर बसविण्यासाठी विरोध असल्याचे सांगणार आहे. वरिष्ठांचा निर्णय प्राप्त होईपर्यंत पुढील कार्यवाही होणार नाही असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.
———————————

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: