PMC GB on Garbage | कचरा माफिया ठेकेदारांनी शहरात कचरा साठवला | विरोधी पक्षांचा मुख्य सभेत जोरदार आरोप

Homeadministrative

PMC GB on Garbage | कचरा माफिया ठेकेदारांनी शहरात कचरा साठवला | विरोधी पक्षांचा मुख्य सभेत जोरदार आरोप

Ganesh Kumar Mule May 18, 2026 9:00 PM

First installment | 7th Pay Commission | पहिल्या हफ्त्याची रक्कम देण्याबाबतची संगणक प्रणाली अद्ययावत  | रक्कम लवकरात लवकर मिळेल अशी कर्मचाऱ्यांना अपेक्षा 
Merged 23 Villages DP | शहराच्या नियोजनाला गती देणाऱ्या महत्त्वपूर्ण प्रस्तावास शहर सुधारणा समितीची मान्यता
Shivajinagar ST Stand |काँग्रेसच्या आंदोलनाने शिवाजीनगर एसटी स्थानकाचे काम मार्गी | माजी आमदार मोहन जोशी

PMC GB on Garbage | कचरा माफिया ठेकेदारांनी शहरात कचरा साठवला | विरोधी पक्षांचा मुख्य सभेत जोरदार आरोप!

 

Pune Breaking News – (The Karbhari News Service) –  शहरात गेल्या आठवड्या भरापासून कचरा साठलेला आहे. फीडर पॉइंट वरील कचरा उचलला जात नाही. हा कचरा साठला नसून तो साठवलेला आहे आणि काही कचरा माफिया ठेकेदारानी हा कचरा साठवला आहे. त्या ठेकेदारांचे टेंडर मान्य होत नाही म्हणून शहरवासियांना वेठीस धरण्यात येत आहे. असा आरोप विरोधी बाकावरील नगरसेवकांनी मुख्य सभेत केला. (PMC General Body Meeting)

शहरात कचरा समस्या वाढली आहे. शहरातील कचरा उचलला जात नाही. त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. असा मुद्दा भाजपचे नगरसेवक पृथ्वीराज सुतार यांनी उपस्थित केला. याच विषयावरून सर्वपक्षीय नगरसेवकानी मुख्य सभेत प्रशासनाला धारेवर धरले.

विरोधी पक्षनेता निलेश निकम यांनी सांगितले की, शहरातील काही भागात फीडर पॉईंट वरून कचरा उचलला जात नाही. त्यामुळे कुत्र्यांकडून कचरा रस्त्यावर आणला जाती आहे. यामुळे शहरात स्वच्छता दिसत नाही तसेच आजार देखील वाढू लागले आहेत. कांग्रेस नगरसेवक अरविंद शिंदे म्हणाले की, शहरात कचरा साठलेला नसून तो मुद्दाम साठवण्यात आला आहे. कचरा माफिया ठेकेदारानी ७०० कोटींचे टेंडर मान्य करून घेण्यासाठी शहराला वेठीस धरले आहे. असे शिंदे म्हणाले, शिंदे पुढे म्हणाले, विभागाचे खातेप्रमुख सहायक आयुक्त असताना देखील त्यांच्याकडे पदभार दिला जात आहे. तसेच ठेकेदार कचरा उचलत नाहीत, त्यांना ब्लॅकलिस्ट करण्याची मागणी शिंदे यांनी केली.

काँग्रेस नगरसेवक दत्ता बहिरट यांनी आरोप केला की, माझ्या प्रभागातील ६९ स्वच्छता कर्मचारी दुसरीकडे काम करतात. असे असेल तर शहरात स्वच्छता कधी दिसेल? प्रशांत जगताप यांनी आरोप केला की, ठेकेदाराचे टेंडर मान्य करावे यासाठी कृत्रिम समस्या निर्माण करण्यात आली आहे. कमला नेहरू रुग्णालयातील मेडिकल वेस्ट ८ दिवसापासून उचलण्यात आले नव्हते. महापालिका आयुक्त यांनी लक्ष दिल्यामुळे कचरा उचलला गेला. त्यामुळे याबाबत सत्ताधारी आणि प्रशासन यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज निर्माण झाली आहे. असे जगताप म्हणाले.

मुख्य सभेत विरोधी आणि सत्ताधारी अशा सर्वच नगरसेवकाने कचरा प्रश्नावर प्रशासनाला धारेवर धरले. मात्र प्रशासन जेव्हा यावर उत्तर देऊ लागले, तेव्हाच शहर आणि जिल्ह्यात विधानपरिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असल्याचा निरोप जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आला. त्यामुळे मुख्य सभा तहकूब करावी लागली.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: