PMC Garbage Collection Charges | पुण्यात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला आपल्या घरातील कचरा संकलन बाबत ही माहिती असणे गरजेचे!

HomeपुणेBreaking News

PMC Garbage Collection Charges | पुण्यात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला आपल्या घरातील कचरा संकलन बाबत ही माहिती असणे गरजेचे!

गणेश मुळे Jul 16, 2024 1:31 PM

 The Swachh award to the PMC is due to the employee who does the daily work of cleanliness  | PMC Commissioner Vikram Kumar
PMC Solid Waste Management Bylaws | कचरा जाळणे, ओला-सुका कचरा वेगळा न करणे आता नागरिकांना पडणार महागात! |  दंडाच्या रकमेत प्रचंड वाढ 
PMC Solid Waste Management Bylaws | हवा आणि ध्वनी प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या बावधन मधील मार्बल मार्केट कंपनी वर महापालिकेची कारवाई 

PMC Garbage Collection Charges | पुण्यात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला आपल्या घरातील कचरा संकलन बाबत ही माहिती असणे गरजेचे! 

 
PMC Solid Waste Management – (The Karbhari News Service) – स्वच्छ पुणे सेवा सहकारी संस्थेच्या (Swach) कचरा वेचकांमार्फत
पुणे शहरात दारोदारी कचरा संकलन करण्यात येते. त्यानुसार पुणे महापालिका घनकचरा विभागाकडून (PMC Solid Waste Management Department) शुल्क ठरवून देण्यात आले आहेत. त्यानुसार रहिवाशी घरांसाठी प्रति महिना 85 रुपये, व्यावसायिक आस्थापनासाठी 170 तर झोपडपट्टीतील घरांसाठी 65 रुपये शुल्क आकारण्यात येत आहे. नागरिकांनी स्वच्छ च्या लोकांकडे कचरा द्यावा. इतर कुठल्या एजेन्सी ला कचरा देऊ नये आणि जास्त दर आकारल्यास महापालिकेकडे तक्रार करावी. असे आवाहन उपायुक्त संदीप कदम (Sandip Kadam PMC) यांनी केले आहे. (Pune Municipal Corporation (PMC) 

केंद्र शासनाच्या पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाच्या अधिसूचना अन्वये घनकचरा व्यवस्थापन नियम, 2016 लागू केले आहेत. या नियमांअंतर्गत प्रत्येक कचरा निर्मात्याने ( नागरिकांनी ) विघटनशील (कुजणारा किंवा ओला), अविघटनशील (न कुजणारा किंवा सुका), घरगुती धोकादायक (कीटकनाशकांचे डबे, बल्ब्स, मुदत संपलेली औषधे, वापरलेल्या / खराब झालेल्या बॅटरीज, सिरिंज इ.) आणि सॅनिटरी वेस्ट (सॅनिटरी नॅपकिन्स, डायपर्स) असा वर्गीकृत केलेला कचरा स्वतंत्रपणे देवून महानगरपालिकेने नेमून दिलेल्या व्यक्तीकडे / एजन्सीकडे देणे बंधनकारक आहे. (Pune PMC News)

 यानुसार  स्वच्छ पुणे सेवा सहकारी संस्थेच्या कचरा वेचकांमार्फत दारोदारी कचरा संकलन करणेस मान्यता प्राप्त झाली आहे.  त्यासाठी या कचरा वेचकांना
नागरिकांकडून खालीलप्रमाणे वापरकर्ता शुल्क आकारण्याची मुभा दिली आहे.

1. रहिवाशी घरे (प्रती घर / प्रती महिना) – 85 रु.
2. व्यावसायिक आस्थापना (प्रती आस्थापना / प्रती महिना. – 170 रु.
3. झोपडपट्टीतील घरे ( प्रती घर / प्रती महिना ) – 65 रु.