PMC Solid Waste Management Department | पुणे महापालिकेच्या घनकचरा विभागाने जानेवारी महिन्यात वसूल केला ६० लाखाचा दंड!
| अस्वच्छता करणाऱ्या साडेसात हजारहून अधिक नागरिकांवर कारवाई
PMC Solid Waste Management Department – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या (PMC Solid Waste Management Department) वतीने सार्वजनिक जागी थुंकणे, कचरा जाळणे, अस्वच्छता करणे, अशा कारणांसाठी दंडात्मक कारवाई केली जाते. विभागाने ही कारवाई गंभीरपणे सुरु केली आहे. १ जानेवारी ते ३१ जानेवारी या काळात सर्व क्षेत्रीय कार्यालयाच्या माध्यमातून आणि १८ स्कॉड व्हेईकल च्या साहाय्याने ६० लाख ३० हजाराचा दंड वसूल करण्यात आला आहे. स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी गेल्या महिन्याभरात साडेसात हजाराहून अधिक पुणेकरांवर ही दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. अशी माहिती उपायुक्त संदीप कदम (Deputy Commissioner Sandip Kadam) यांनी दिली. (Pune Municipal Corporation)
| दंड घेण्याची तरतूद
पुणे महापालिकेने सार्वजनिक जागी स्वच्छता राखण्यासाठी स्वच्छता उपविधी तयार केली आहे. त्या नियमानुसार अस्वच्छता करणाऱ्या नागरिकांस दंडात्मक कारवाई केली जाते. यामध्ये सार्वजनिक जागी थुंकणे, लघवी करणे, कचरा जाळणे, कचऱ्याचे सुका आणि ओला असे वर्गीकरण न करणे, नदीत राडारोडा टाकणे, अशा गोष्टींचा समावेश आहे. यासाठी १८० रुपयापासून ते ५ हजार रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद आहे. लोकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाने ही कारवाई सुरु केली आहे. असे कदम यांनी सांगितले. (PMC Pune)
| १८ स्कॉड व्हेईकल च्या माध्यमातून कारवाई
पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रात १५ क्षेत्रिय कार्यालये व केंद्रीय प्लास्टिक पथक यांचेमार्फत दैनंदिन स्वरूपात दंडात्मक कारवाई करण्यात येत असते. यामध्ये सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणे, बंदी असलेल्या प्लास्टिकचा वापर करणे, राडारोडा टाकणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, कचरा जाळणे इ. विविध प्रकरच्या बाबींकरीता दंडात्मक कारवाई करण्यात येत असते. या कारवाईकरीता मागील वर्षी जानेवारी रोजी एकूण ४ बोलेरो गाड्या व १८ जुलै रोजी एकूण ४ बोलेरो गाड्या देण्यात आल्या होत्या. तर मागील काही दिवसात एकूण १० बोलेरो व्हॅन उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. १५ क्षेत्रिय कार्यालयांकरीता प्रत्येकी १, केंद्रीय प्लास्टिक पथकाकरीता १, घनकचरा व्यवस्थापन मुख्य विभागांतर्गत अभियांत्रिकी वर्गाकरीता १ व सॅनिटेशन विभागाकरिता १ अशा प्रकारे एकूण १८ बोलेरो गाड्या विभागाकडे आहेत.
| असा केला दंड वसूल
जानेवारीच्या पहिल्या महिन्याच्या कालावधीत सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याबाबद्दल २२३ लोकांकडून २ लाख २३ हजार दंड वसूल करण्यात आला. सार्वजनिक ठिकाणी लघवी करणाऱ्या ९१६ जणांकडून १ लाख ८० हजार रुपये वसूल केले. कचरा जाळणाऱ्या १६ लोकांकडून ८० हजार रु वसूल करण्यात आले. कचऱ्याचे वर्गीकरण न केल्याबद्दल ४९८ लोकांकडून १ लाख ७९ हजार रुपये वसूल करण्यात आले. घरगुती कचरा स्वच्छ च्या लोकांना देण्यास नकार देणाऱ्या १२ लोकांकडून २६ हजार वसूल करण्यात आले. सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्या ५५०४ लोकांकडून ३१ लाख ८२ हजार रुपये वसूल करण्यात आले. बल्क वेस्ट जनरेटर कचरा प्रक्रिया प्रकल्प बंद बाबत १० लोकांकडून ७९ हजार वसूल केले. बांधकाम राडारोडा टाकणाऱ्या १०८ लोकांकडून ७ लाख ५ हजार वसूलण्यात आले. २५५ लोकांवर प्लास्टिक कारवाई करत होते १२ लाख ९५ हजार वसूल करण्यात आले. अशा एकूण ७ हजार ५९३ लोकांवर दंड ठोठावत महापालिकेने ६० लाख २९ हजार ९८० रुपये वसूल केले. (Pune Municipal Corporation – PMC)
COMMENTS