PMC ESR 2025-26 | मेट्रो प्रकल्पामुळे पुण्याच्या हवेच्या प्रदूषणात वाढ | हिवाळ्यात प्रदूषणाची पातळी चिंताजनक

Homeadministrative

PMC ESR 2025-26 | मेट्रो प्रकल्पामुळे पुण्याच्या हवेच्या प्रदूषणात वाढ | हिवाळ्यात प्रदूषणाची पातळी चिंताजनक

Ganesh Kumar Mule Jul 29, 2026 7:43 PM

PMC Nadi Swachhata Abhiyan | जागतिक वसुंधरा दिनानिमित्त  घनकचरा व्यवस्थापन व पर्यावरण विभागामार्फत  नदी स्वच्छता अभियानाचे आयोजन
PMC Fog Canon Machine | दिवाळीच्या फटाक्या मुळे वाढलेले हवा प्रदूषण पाहता महापालिका गुरुवार पासून करणार फॉग कॅनॉन मशीनचा वापर | गेल्या काही महिन्यापासून मशीन होत्या बंद 
PMC Environment Week |पुणे महापालिकेच्या पर्यावरण सप्ताहाचे उद्घाटन 

PMC ESR 2025-26 | मेट्रो प्रकल्पामुळे पुण्याच्या हवेच्या प्रदूषणात वाढ | हिवाळ्यात प्रदूषणाची पातळी चिंताजनक

| पुणे महापालिकेच्या पर्यावरण अहवालातून धक्कादायक माहिती समोर,

 

PMC Environment Department – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेने नुकताच प्रसिद्ध केलेल्या ‘पर्यावरण सद्य:स्थिती अहवाल 2025-2026’ मध्ये पुण्याच्या हवा गुणवत्तेबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. शहरातील वेगवान शहरीकरण आणि मेट्रो फेज-2 सारख्या मोठ्या पायाभूत प्रकल्पांमधून होणारी उडती धूळ यामुळे हवेचे प्रदूषण वाढत असल्याचे अहवालात म्हटले आहे. (PMC Environment Status Report 2025-26)

हिवाळ्यात प्रदूषणाचा धोका अधिक
अहवालानुसार वर्षातील बहुतांश काळात पुण्यातील हवा गुणवत्ता ‘समाधानकारक’ ते ‘मध्यम’ या श्रेणीत असते. मात्र हिवाळ्यात प्रदूषणाची पातळी सातत्याने आणि लक्षणीय वाढते. यामागचे प्रमुख कारण म्हणजे हिवाळ्यात वाऱ्याचा वेग कमी असतो. त्यामुळे उत्सर्जित होणाऱ्या प्रदूषकांचे विरलीकरण होत नाही आणि ते शहराच्या वातावरणात अडकून राहतात. परिणामी नागरिकांच्या आरोग्यावरील धोका अधिक तीव्र होतो.

मेट्रो आणि वाहतूक हे मुख्य कारण
शहरातील प्रदूषण वाढीमागे मेट्रो फेज-2 सारख्या मोठ्या पायाभूत प्रकल्पांमधून निर्माण होणारी उडती धूळ, तसेच दाट वाहतूक असलेल्या मार्गांवरील वाहनांमधून होणारे वाढते उत्सर्जन ही प्रमुख कारणे असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

गेल्या पाच वर्षांच्या आकडेवारीवरून सन 2025-26 मध्ये प्रदूषणाच्या पातळीत पुन्हा वाढ झाल्याचे स्पष्ट दिसून येते. राष्ट्रीय समोभवतालच्या हवा गुणवत्ता मानकांचे पालन होत असले, तरी अनेक प्रसंगी जागतिक आरोग्य संघटनेने शिफारस केलेल्या अधिक कडक मानकांचे उल्लंघन आढळते.

कोणत्या भागात प्रदूषण अधिक?
शहरातील प्रदूषणाची तीव्रता ही स्थान आणि ऋतुनुसार बदलते. अहवालानुसार शिवाजीनगर आणि हडपसर यांसारख्या दाट वस्तीच्या व्यापारी व वाहतूकप्रधान भागांमध्ये प्रदूषणाची पातळी तुलनेने अधिक आढळते.
तर याउलट, पाषाण आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरासारख्या हिरव्या आणि संस्थात्मक क्षेत्रांमध्ये प्रदूषणाची मूळभूत पातळी तुलनेने कमी आहे.

महापालिकेचे उपाय
प्रदूषण कमी करण्यासाठी पुणे महापालिकेने स्वच्छ इंधनाचा वापर बंधनकारक करणे, उघड्यावर कचरा व जैवभार जाळण्यास प्रतिबंध करणे आणि बांधकाम स्थळांवर धूळ नियंत्रणासाठी यंत्रणा कार्यान्वित करणे अशा विविध उपाययोजना राबवल्या आहेत.

तथापि, शहरातील शहरीकरणाचा वेग अधिक असल्यामुळे राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत सुधारित उद्दिष्टे साध्य करणे अद्यापही आव्हानात्मक आहे.

जून ते सप्टेंबर या मान्सून काळातील मुसळधार पर्जन्य वेट स्कॅव्हेंजिंग प्रक्रियेद्वारे वातावरणातील प्रदूषके प्रभावीपणे दूर करतो. मात्र याउलट हिवाळ्यातील कमी तापमान, मंद वारे आणि तापमान प्रतिलोमन यामुळे प्रदूषके जमिनीच्या जवळ अडकून राहतात आणि नागरिकांचा त्यांच्याशी होणारा संपर्क वाढतो.

त्यामुळे सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढवणे, बांधकामांसाठी अधिक कठोर नियम आणि सर्व निरीक्षण केंद्रांकडून पूर्ण व अचूक हवा गुणवत्ता निरीक्षण यंत्रणेचे तातडीने बळकटीकरण करणे आवश्यक असल्याचे अहवालात सुचवण्यात आले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0