Bhagwan Vishwakarma Jayanti | सरकारच्या आदेशानुसार महापालिका कामगार कल्याण विभागाने साजरी केली भगवान विश्वकर्मा यांची जयंती
PMC Labour Welfare Department – (The Karbhari News Service) – राज्य सरकारच्या उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागच्या आदेशानुसार पुणे महानगरपालिका कामगार कल्याण विभागात आज भगवान विश्वकर्मा प्रतिमेचे पूजन नितन केंजळे, मुख्य कामगार अधिकारी (Nitin Kenjale PMC) यांच्या हस्ते करून जयंती साजरी करण्यात आली. यावेळी कामगार कल्याण विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. (Pune Municipal Corporation – PMC)
राज्य सरकारच्या उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागने आदेशित केले होते कि, कामगार विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व कार्यालयामध्ये भगवान विश्वकर्मा यांची प्रतिमा लावण्यात यावी. तसेच १७ सप्टेंबर ला प्रतिमेचे पूजन करून त्यांची जयंती साजरी करण्यात यावी. त्यानुसार कामगार कल्याण विभागाने ही जयंती साजरी केली, असे कामगार कल्याण अधिकारी नितीन केंजळे यांनी सांगितले.

भगवान विश्वकर्मा हे हिंदू धर्मातील वास्तुशास्त्र, स्थापत्यकला, यांत्रिकी आणि शिल्पकलेचे देवता मानले जातात. त्यांना “देवशिल्पी”, “दिव्य अभियंता” (Divine Architect) आणि “संपूर्ण विश्वाचा निर्माता” असेही संबोधले जाते. विश्वकर्मा हे ब्रह्मदेवाचे मानसपुत्र मानले जातात. त्यांच्या पाच पुत्रांचे वंश पुढे विविध कारागीर समाजात विभक्त झाले आहेत. ते यंत्रशास्त्र, आर्किटेक्चर, धातुकर्म, शिल्पकला, इमारत बांधकाम, यंत्रांची निर्मिती अशा अनेक तांत्रिक व शास्त्रीय कलेचे उगमस्थान मानले जातात. सुतार, लोहार, वेल्डर, इंजिनीयर, आर्किटेक्ट्स, टेक्निशियन, कारागीर इत्यादींमध्ये विश्वकर्मा देवतेची विशेष भक्ती असते. कामगार, कारागीर, इंजिनीयर, कारखाने, उद्योगधंदे, मशिनरी वापरणारे लोक भगवान विश्वकर्मांची पूजा करतात.
—

COMMENTS