Shrinath Bhimale PMC |  सारसबाग-पर्वती रोप-वेच्या दिशेने महापालिकेचे पहिले पाऊल; सल्लागार नियुक्तीला स्थायी समितीची मान्यता

पुणे महापालिकेच्या प्रस्तावित सारसबाग ते पर्वती रोप-वे प्रकल्पासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नियुक्त करण्यास स्थायी समितीने मान्यता दिली आहे.

HomeBreaking News

Shrinath Bhimale PMC |  सारसबाग-पर्वती रोप-वेच्या दिशेने महापालिकेचे पहिले पाऊल; सल्लागार नियुक्तीला स्थायी समितीची मान्यता

Ganesh Kumar Mule Oct 31, 2026 8:46 PM

PMC Encroachment Department | खराडी, विमाननगर परिसरात जोरदार अतिक्रमण कारवाई | अतिक्रमण विभागाची माहिती
Vaikunth Samshasnbhumi | वैकुंठ स्मशानभूमीसाठी  टेक्निकल कन्सल्टन्ट नेमण्यास स्थायीची मंजूरी
PMC Pune Recruitment | पुणे महापालिकेत 320 पदांसाठी भरती! | 8 ते 28 मार्च पर्यंत करू शकता अर्ज

Shrinath Bhimale PMC |  सारसबाग-पर्वती रोप-वेच्या दिशेने महापालिकेचे पहिले पाऊल; सल्लागार नियुक्तीला स्थायी समितीची मान्यता

| पेशवे पार्क ते पर्वती ७५० मीटरचा प्रस्तावित मार्ग; अवघ्या अडीच मिनिटांत गाठता येणार पर्वती

 

PMC Standing Committee – The Karbhari News Service – पुणे शहरातील पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रस्तावित असलेल्या सारसबाग ते पर्वती रोप-वे प्रकल्पाच्या नियोजनाला आता गती मिळणार आहे. या प्रकल्पासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नियुक्त करण्यास स्थायी समितीने मान्यता दिली आहे. प्रकल्पाचा सविस्तर आराखडा तयार करणे, तांत्रिक व आर्थिक व्यवहार्यता तपासणे तसेच निविदा प्रक्रिया राबविण्याची जबाबदारी सल्लागारावर सोपविण्यात येणार आहे, अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भीमाले यांनी दिली.

शहरातील पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी असलेला हा प्रकल्प महापालिकेने प्रस्तावित केला आहे. त्यासाठी २०२६-२७ च्या अंदाजपत्रकात एक कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. रोप-वे प्रकल्प इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल तंत्रज्ञानावर आधारित असल्याने महापालिकेकडे यासाठी आवश्यक तज्ज्ञ मनुष्यबळ उपलब्ध नाही. त्यामुळे प्रकल्पाच्या नियोजनापासून निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यापर्यंतची जबाबदारी सल्लागाराकडे देण्याचे नियोजन आहे.

| सल्लागारासाठी किमान २ कोटी ५४ लाखांचे शुल्क

सल्लागार नियुक्तीसाठी महापालिकेने ऑगस्ट २०२६ मध्ये निविदा मागविल्या होत्या. सल्लागाराला प्रकल्पाच्या रकमेच्या १.२७ टक्के किंवा किमान दोन कोटी ५४ लाख रुपये, यापैकी जी रक्कम अधिक असेल ती शुल्क म्हणून देण्याचे प्रस्तावित आहे. या शुल्कावर जीएसटी आणि अन्य लागू कर अतिरिक्त असतील.

| पीपीपी आणि डीबीएफओटी पद्धतींचाही अभ्यास

सल्लागाराकडून प्रस्तावित प्रकल्पाच्या जागेची पाहणी करून सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर), अंदाजपत्रक आणि निविदेच्या अटी-शर्ती तयार करण्यात येणार आहेत. तसेच प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या शासकीय परवानग्यांची प्रक्रिया निश्चित केली जाणार आहे.

हा प्रकल्प सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) किंवा डीबीएफओटी पद्धतीने राबविणे आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य ठरेल का, याचाही अभ्यास केला जाणार आहे. निविदा प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या कंपन्यांचे तांत्रिक व आर्थिक मूल्यमापन करून कार्यादेश देण्यापर्यंतची प्रक्रिया सल्लागारामार्फत पूर्ण केली जाणार आहे.

| ७५० मीटरचा रोप-वे; २२ केबिनमधून प्रवासी वाहतूक

प्रस्तावित आराखड्यानुसार पेशवे पार्क ते पर्वतीदरम्यान सुमारे ७५० मीटर लांबीचा रोप-वे उभारण्याचे नियोजन आहे. या मार्गावर १२ ते ४० मीटर उंचीचे पाच टॉवर उभारण्यात येणार असून, प्रत्येकी आठ प्रवाशांची क्षमता असलेल्या २२ केबिन प्रस्तावित आहेत.

या रोप-वेच्या माध्यमातून अवघ्या अडीच मिनिटांत पर्वती गाठता येणार आहे. तसेच एका दिशेने ताशी १,५०० प्रवाशांची वाहतूक करण्याची क्षमता प्रस्तावित करण्यात आली आहे. सल्लागाराचा सविस्तर अहवाल प्राप्त झाल्यानंतर प्रकल्पाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीबाबत पुढील निर्णय घेतला जाणार आहे.

—

| : असा असेल प्रस्तावित रोप-वे

– **मार्ग :** पेशवे पार्क ते पर्वती
– **लांबी :** सुमारे ७५० मीटर
– **टॉवर :** ५
– **टॉवरची उंची :** १२ ते ४० मीटर
– **केबिन :** २२
– **प्रत्येक केबिनची क्षमता :** ८ प्रवासी
– **प्रवासाचा कालावधी :** अडीच मिनिटे
– **वाहतूक क्षमता :** एका दिशेने ताशी १,५०० प्रवासी

| सल्लागाराकडे असणार या जबाबदाऱ्या

– प्रकल्पाची तांत्रिक व आर्थिक व्यवहार्यता तपासणे.
– सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) आणि अंदाजपत्रक तयार करणे.
– पीपीपी आणि डीबीएफओटी पद्धतींचा अभ्यास करणे.
– आवश्यक शासकीय परवानग्यांसाठी मार्गदर्शन करणे.
– निविदेच्या अटी-शर्ती तयार करणे.
– निविदांमधील कंपन्यांचे तांत्रिक व आर्थिक मूल्यमापन करणे.
– कार्यादेश देण्यापर्यंतची प्रक्रिया पूर्ण करणे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: