PMC Employee 12th Results | धनकवडी क्षेत्रीय कार्यालयातील कंत्राटी सफाई सेविका  रूपाली सिद्धेश्वर माळी झाल्या १२ वी उत्तीर्ण! | “आता थांबायचं नाय” या चित्रपट पाहून मिळाली प्रेरणा

Homeadministrative

PMC Employee 12th Results | धनकवडी क्षेत्रीय कार्यालयातील कंत्राटी सफाई सेविका  रूपाली सिद्धेश्वर माळी झाल्या १२ वी उत्तीर्ण! | “आता थांबायचं नाय” या चित्रपट पाहून मिळाली प्रेरणा

Ganesh Kumar Mule May 03, 2026 8:03 AM

40% Tax Exemption | ४०% करसवलत | राज्य सरकार घालणार लक्ष | मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती
Hoarding Policy | पुण्यात होर्डिंग चे दर दुप्पट करण्याच्या तयारीत महापालिका!  | आकाशचिन्ह विभागाचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात 
G 20 Summit in Pune | पायाभूत साक्षरता आणि संख्याशास्त्र प्रदर्शनाला पाच लाख पुणेकर भेट देणार

PMC Employee 12th Results | धनकवडी क्षेत्रीय कार्यालयातील कंत्राटी सफाई सेविका  रूपाली सिद्धेश्वर माळी झाल्या १२ वी उत्तीर्ण! | “आता थांबायचं नाय” या चित्रपट पाहून मिळाली प्रेरणा

| सगळीकडून अभिनंदनाचा वर्षाव

 

PMC Employees  – (The Karbhari News Service) – धनकवडी क्षेत्रीय कार्यालयात कंत्राटी पद्धतीमध्ये सफाई काम करणाऱ्या महिला सेविका  रूपाली माळी या  “आता थांबायचं नाय” या चित्रपटातून प्रेरणा घेत  बारावीच्या परीक्षे मध्ये 53% मार्क घेऊन पास झाल्या. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन कंठत त्यांनी हे यश मिळवल्याने त्यांच्यावर सगळीकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. (PMC Dhankawadi Ward Office)

माळी या पतीच्या निधनानंतर सासरच्या लोकांनी त्यांची साथ सोडली. त्यामुळे आपल्या माहेरी राहून धनकवडी क्षेत्रीय कार्यालयामध्ये कंत्राटी सफाई सेविका म्हणून काम करू लागल्या. आपल्या लहान दोन बाळांचा सांभाळ करत करत उच्च माध्यमिक शिक्षण घेऊन त्या बारावी पास झाल्या. पतीच्या निधनानंतर मुलांना सांभाळण्याची जबाबदारी घेऊन रूपाली माळी या सासरहून माहेरी राहण्यासाठी धनकवडी मध्ये राहायला आल्या. स्वतःचा आरोग्य धोक्यात घालून मुलांना सांभाळण्यासाठी व स्वतःच्या पोटाची खळगी भरण्यासाठी  सफाई काम करू लागल्या. काम करत असताना शिक्षणाची ओढ असल्याने त्यांनी बाहेरून परीक्षेचा फॉर्म भरला. दिवसभर सफाई चे काम करायचे आणि उरलेल्या वेळामध्ये धुणी भांडी व स्वयंपाकाचे काम करत करत संध्याकाळी मुलांचा अभ्यास घेऊन स्वतः पण त्या रात्री उशिरापर्यंत अभ्यास करत होत्या. डोक्यावरील पतीचे छत्र नसताना सुद्धा त्यांनी जीवनात शिक्षण शिकून काहीतरी वेगळं घडवण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

मला माझ्या जीवनात शिक्षण शिकण्याची उमेद माझे भाऊ व आई यांनी मला प्रेरणा दिली. तसेच मला पुणे महानगरपालिका कामगार युनियनच्या जनरल सेक्रेटरी कॉ.मुक्ता मनोहर अध्यक्ष कॉ. उदय भट, कॉ. मधुकर नरसिंगे, कॉ. वैजीनाथ गायकवाड, कॉ. शोभा बनसोडे, कॉ. विजय पवार यांनी मला वेळोवेळी मार्गदर्शन केले व प्रेरणा दिली. मला  उच्च शिक्षण पूर्ण करून माझ्या दोन्ही मुलांना शिकवून मोठं करायचं आहे.

| रुपाली माळी. 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0