PMC Duct Policy | ओव्हरहेड केबल मुळे नागरिकांचा जीव धोक्यात | duct policy वर अमल करण्याची आमदार सिद्धार्थ शिरोळे यांची मागणी 

HomeBreaking News

PMC Duct Policy | ओव्हरहेड केबल मुळे नागरिकांचा जीव धोक्यात | duct policy वर अमल करण्याची आमदार सिद्धार्थ शिरोळे यांची मागणी 

Ganesh Kumar Mule Jul 03, 2025 8:14 PM

National Water Awards | महाराष्ट्राला ३ राष्ट्रीय जल पुरस्कार
Kundmala Incident | कुंडमळा येथे  ५१ पर्यटकांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश
old pension Scheme | जुन्या पेन्शन वरून पुणे महापालिका कर्मचारी आक्रमक  | 11 फेब्रुवारीला मेळावा

PMC Duct Policy | ओव्हरहेड केबल मुळे नागरिकांचा जीव धोक्यात | duct policy वर अमल करण्याची आमदार सिद्धार्थ शिरोळे यांची मागणी

 

MLA Siddharth Shirole – (The Karbhari News Service) – ओव्हरहेड केबल मुळे नागरिकांचा जीव धोक्यात आला असून duct policy वर अमल करण्याची आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी विधानसभेत मागणी केली. (Pune Overhead Cable)

 

आमदार शिरोळे यांनी केबल चा मुद्दा उपस्थित करत सांगितले कि, नांदेड सिटी कडून पुणे शहरात येताना अचानक तुटलेली केबल दुचाकीस्वराच्या मानेला घासून अपघात झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी झाली होती. शहरातील बहुतांश रस्त्यांवर अनअधिकृतपणे इंटरनेट आणि केबल टीव्हीसाठी च्या केबल टाकण्यात आल्या आहेत, या केबल कशाही पसरल्या जातात आणि शहराचा चेहरा हा अतिशय कुरूप होतो. तसेच वारा आणि पाऊस झाला तर या केबल तुटण्याची शक्यता असते जेणेकरून नागरिकांना एक मोठा धोका निर्माण झाला आहे.

2018 मध्ये प्रशासनाने duct पॉलिसीला मंजुरी दिली होती. पण ती काय अमलात आणता आली नाही. महापालिकेकडून भूमिगत केबल टाकण्याकरिता खासगी internet कंपन्यांकडून १२००० प्रति running meter असा शुल्क घेतला जातो. हा शुल्क टाळण्याकरिता खासगी कंपन्या overhead cables टाकून सुविधा पुरवितात. हा शुल्क जास्त असून त्या बद्दल फेरविचार करणे गरजेचे आहे.

शिरोळे म्हणाले, उत्तम दर्जाची आणि सुरक्षित इंटरनेट सेवा जर आपल्याला शहरांना द्यायची असेल तर शासनाने ही duct policy सक्तीची केली पाहिजे. यामुळे वारंवार होणारे अपघात तसेच आज जो शहराचा चेहरा या सर्वत्र लटकत्या केबल्समुळं कुरूप दिसत आहे तो पण पूर्णपणे बदलून जाईल. तसेच ducting झाल्यास इतर केबल जश्या कि electric cables , cctv वगैरे सुद्धा यातून टाकता येतील. माझा सभागृहाला प्रश्न आहे शासन duct policy पुणे शहरासाठी आमलात आणणार का ? असा प्रश्न शिरोळे यांनी उपस्थित केला.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: