PMC Scod Vehicle | दंडात्मक कारवाईसाठी घनकचरा विभागाच्या ताफ्यात 18 स्कॉड व्हेईकल! | आज उपलब्ध झाल्या नवीन १० गाड्या

Homeadministrative

PMC Scod Vehicle | दंडात्मक कारवाईसाठी घनकचरा विभागाच्या ताफ्यात 18 स्कॉड व्हेईकल! | आज उपलब्ध झाल्या नवीन १० गाड्या

Ganesh Kumar Mule Dec 24, 2024 8:28 PM

 4 Special Scod Vehicles in fleet of PMC Solid Waste Management Department
PMC Solid Waste Management Department | पुणे महापालिकेच्या घनकचरा विभागाने जानेवारी महिन्यात वसूल केला ६० लाखाचा दंड!
PMC Solid Waste Management | स्वच्छतेचं दैनंदिन काम करणाऱ्या कर्मचाऱ्यामुळेच महापालिकेला स्वच्छतेचा पुरस्कार | आयुक्त विक्रम कुमार 

PMC Scod Vehicle | दंडात्मक कारवाईसाठी घनकचरा विभागाच्या ताफ्यात 18 स्कॉड व्हेईकल! | आज उपलब्ध झाल्या नवीन १० गाड्या

 

PMC Solid Waste Management Department – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) , क्षेत्रिय कार्यालयांतर्गत (PMC Ward office) दंडात्मक कारवाईकरीता बोलेरो गाडीचे (Scod Vehicle ) नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार घनकचरा विभागाकडे याआधी ८ गाड्या उपलब्ध होत्या. त्यानंतर आज नवीन १९ गाड्या उपलब्ध झाल्या आहेत. अशी माहिती उपायुक्त संदीप कदम (Sandip Kadam PMC) यांनी दिली. (Pune PMC News)

पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रात १५ क्षेत्रिय कार्यालये व केंद्रीय प्लास्टिक पथक यांचेमार्फत दैनंदिन स्वरूपात दंडात्मक कारवाई करण्यात येत असते. यामध्ये सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणे, बंदी असलेल्या प्लास्टिकचा वापर करणे, राडारोडा टाकणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, कचरा जाळणे इ. विविध प्रकरच्या बाबींकरीता दंडात्मक कारवाई करण्यात येत असते. या कारवाईकरीता ३१ जानेवारी  रोजी एकूण ४ बोलेरो गाड्या व दिनांक १८ जुलै  रोजी एकूण ४ बोलेरो गाड्या देण्यात आल्या होत्या. तर आज एकूण १० बोलेरो व्हॅन उपलब्ध करून देण्यात आल्या असून १५ क्षेत्रिय कार्यालयांकरीता प्रत्येकी १, केंद्रीय प्लास्टिक पथकाकरीता १, घनकचरा व्यवस्थापन मुख्य विभागांतर्गत अभियांत्रिकी वर्गाकरीता १ व सॅनिटेशन विभागाकरिता १ अशा प्रकारे एकूण १८ बोलेरो वाहनांचे वाटप करण्यात आले.

घनकचरा व्यवस्थापन विभागांतर्गत १५ क्षेत्रिय कार्यालयांमार्फत दिनांक ०२ ऑक्टोबर २०२३ पासून आजपर्यंत एकूण ७२,७७८ केसेस, ४ कोटी ३ लाख ७१ हजार इतका दंड व एकूण ६२६८ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे. या वाहनांचा उद्घाटन समारंभ आज महापालिका आयुक्त, डॉ राजेन्द्र भोसले यांचे शुभहस्ते पार पडला. या उद्घाटन कार्यक्रमाच्या वेळी  पृथ्वीराज बी.पी.,अतिरिक्त महापालिका आयुक्त (इ),  संदिप कदम, मा. उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन, राजीव नंदकर, मा. उपायुक्त, परिमंडळ क्र. १, घनकचरा व्यवस्थापन मुख्य विभागाकडील कार्यकारी अभियंता  प्रसाद जगताप व  मुकुंद बर्वे यांचे सह परिमंडळ १ ते ५ कडील उप प्रमुख आरोग्य निरीक्षक, १५ क्षेत्रिय कार्यालयाकडील सहाय्यक आयुक्त, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक व आरोग्य निरीक्षक इ. उपस्थित होते. यावेळी महापालिका आयुक्त यांनी सर्व क्षेत्रिय कार्यालयांची जबाबदारी वाढलेली असून क्षेत्रिय कार्यालय स्तरावर दोन शिफ्टमध्ये सदरील Scod vehicles वापरून सामुहिकरित्या जास्तीत जास्त जनजागृती व दंडात्मक कारवाई करणेबाबत आदेशित केले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0