PMC Chief Auditor | आकाशचिन्ह विभाग देईना ४०४ कोटींच्या वसुलपात्र रकमेची माहिती

Homeadministrative

PMC Chief Auditor | आकाशचिन्ह विभाग देईना ४०४ कोटींच्या वसुलपात्र रकमेची माहिती

Ganesh Kumar Mule Apr 16, 2026 8:31 AM

PMC Audit Sub-Committee | आकाशचिन्ह विभागाच्या ४०४ कोटी वसुलीची ऑडीट उपसमितीत चर्चा करणार | स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांची माहिती 
PMC Chief Auditor | अखेर पुणे महापालिकेचा मिळाला पूर्ण वेळ मुख्य लेखापरीक्षक!
PMC Chief Auditor | पुणे महापालिकेच्या नवनियुक्त मुख्य लेखापरीक्षक यांच्यापुढे कार्यालयीन शिस्तीची आणि कामकाजाची ढीगभर आव्हाने!

PMC Chief Auditor | आकाशचिन्ह विभाग देईना ४०४ कोटींच्या वसुलपात्र रकमेची माहिती

| मुख्य लेखापरीक्षक यांनी स्थायी समितीच्या निदर्शनास आणली बाब

 

PMC Pune – (The Karbhari News Service) – लेखापरीक्षण अहवालात परवाना व आकाशचिन्ह विभागाकडील जाहिरात फलकांचे वसुलपात्र ४०४ कोटी रकमेपैकी  फेब्रुवारी २०२६ अखेर प्रत्यक्ष वसूल झालेल्या रकमांची माहिती मुख्य लेखापरीक्षक यांनी आकाशचिन्ह विभागाला मागितली होती. मात्र विभागाकडून याबाबत माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे आता मुख्य लेखापरीक्षक विठ्ठल चव्हाण यांनी ही बाब स्थायी समितीच्या निदर्शनास आणून दिली आहे. यावर आजच्या स्थायी समितीच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. (PMC Sky Sign Department)

पुणे महानगरपालिकेच्या परवाना व आकाशचिन्ह विभागाकडील जाहिरात फलक (होर्डिंग्ज) चे लेखापरीक्षण या कार्यालयाकडून करण्यात आले आहे. लेखापरीक्षणात आढळून आलेल्या वसूलपात्र रकमा, आक्षेपार्ह व दोषास्पद बाबींचा अहवाल महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ चे कलम १०६ (१) (अ) नुसार २०२४ साली  स्थायी समितीस सादर करण्यात आला होता.  त्यामध्ये मागील अहवालातील वसूलपात्र  १२६,४६,४९,९७९ ( एकशे सव्वीस कोटी सेहेचाळीस लाख एकोणपन्नास हजार नऊशे एकोणऐंशी ) व  २०२१-२२ ते २०२३-२४ या कालावधीतील वसूलपात्र  २७८,०७,०३, ६१७ (. दोनशे अठठयाहत्तर कोटी सात लाख तीन हजार सहाशे सतरा फक्त) अशी एकूण वसूलपात्र  ४०४,५३,५३,५९६ (चारशे चार कोटी त्रेपन्न लाख त्रेपन्न हजार पाचशे शहाण्णव फक्त ) पैकी फेब्रुवारी- २०२६ अखेर प्रत्यक्ष वसूल झालेली रक्कम याबाबतची तपशिलवार माहिती लेखापरीक्षण विभागास सात दिवसात सादर करणेबाबत १८ मार्च २०२६ रोजी कळविणेत आले होते. परंतु, अद्यापपर्यंत ही माहिती लेखापरीक्षण विभागास उपलब्ध करून देणेत आलेली नाही. ही बाब मुख्य लेखापरीक्षक यांनी स्थायी समितीच्या निदर्शनास आणून दिली आहे.

एकीकडे स्थायी समिती अध्यक्ष महापालिकेचे उत्पन्न वाढ होण्यासाठी प्रयत्न करत असताना आकाशचिन्ह विभागाच्या या उदासीन भूमिकेबाबत आजच्या स्थायी समितीच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: