Shirnath Bhimale on Overhead Cable | धोरण होईपर्यंत ओव्हरहेड केबलची कारवाई थांबणार | केंद्र आणि राज्याच्या गाईडलाइन्स चा अभ्यास करून ८ दिवसात प्रशासन नियमावली बनवणार 

Homeadministrative

Shirnath Bhimale on Overhead Cable | धोरण होईपर्यंत ओव्हरहेड केबलची कारवाई थांबणार | केंद्र आणि राज्याच्या गाईडलाइन्स चा अभ्यास करून ८ दिवसात प्रशासन नियमावली बनवणार 

Ganesh Kumar Mule Apr 16, 2026 8:11 PM

10th and 12th exams | दहावी, बारावी परीक्षेच्या तारखा ठरल्या | जाणून घ्या काय आहे तारीख
Monsoon Session | विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १७ ऑगस्ट पासून
Vetal Tekadi | वेताळ टेकडीला नैसर्गिक वारसास्थळ म्हणून जाहीर करण्याच्या मागणीला जोर | खासदार सुप्रिया सुळे यांचे समर्थन 

Shirnath Bhimale on Overhead Cable | धोरण होईपर्यंत ओव्हरहेड केबलची कारवाई थांबणार | केंद्र आणि राज्याच्या गाईडलाइन्स चा अभ्यास करून ८ दिवसात प्रशासन नियमावली बनवणार

| स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांची माहिती

 

 

PMC Standing Committee – (The Karbhari News Service) –  केंद्र शासनाच्या ऊर्जा आणि दूरसंचार मंत्रालयाने ओव्हरहेड केबल संदर्भात २०२३-२४ मध्येच नियमावली करुन राज्य सरकार आणि महापालिकेला सूचना केल्या आहेत. त्यानुसार महापालिका प्रशासनाने नियमावली करणे आवश्यक आहे. केंद्र सरकारची नियमावली असल्यामुळे महापालिका प्रशासनाला सरसकट कारवाई करता येणार नाही, अशी माहिती महापालिका प्रशासनाने स्थायी समितीच्या बैठकीत दिली.
त्यानंतर सरकारच्या नियमावलीमध्ये राहून महापालिकेने देखील या धर्तीवर दहा दिवसात नियमावली सादर करावी असे आदेश स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी गुरुवारी दिले. (Pune PMC News)

ओव्हरहेड केबल संदर्भात केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार स्वतंत्र नियमावली करणार आहे. शहरातील अत्यावश्यक सेवांच्या केबल आता काढता येतनाहीत. मात्र त्या नियमांच्या चौकटीत बसवाव्या लागणार आहे. सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार केबल नियमीत करण्याच्या सूचना आहेत. महापालिकेच्या पथ दिव्यांच्या खांबावरुन या केबल जाऊ शकतात. असे नियमावलीत नमूद केले असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी बैठकीत दिली.

महापालिका प्रशासनाने शहरात नवीन नियमावलीसाठी समिती केली आहे. या समितीमध्ये विविध टेलिकॉम कंपन्यांचे सदस्य, महापालिकेचे अधिकारी यांचा समावेश केला आहे. ही समिती येत्या दहा दिवसात नियमावली तयार करणार आहे. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार वीज खांबांवरुन अत्यावश्यक सेवांच्या केबल नेल्या जाऊ शकतात.

स्थायी समिती अध्यक्ष भिमाले यांनी शहरातील अनधिकृत केबलवर कारवाईचा बडगा उगारला होता. भिमाले यांनी थेट रस्त्यावर उतरत अनधिकृत केबलच्या विरोधात कारवाई केली होती. या कारवाईनंतर प्रशासनाला ठोस नियमावली करण्याचे आदेश दिले आहेत. शहरांमध्ये मोठ्या कंपन्यांच्या अनधिकृत ओव्हरट केबल आहेत तसेच एका कंपनीने महापालिकेची कोणतेही परवानगी न घेता भूमिकेत केबल टाकल्याची माहिती समोर आली आहे. याची चौकशी करण्याचे आदेश भिमाले यांनी प्रशासना दिले आहेत. या कंपनीवर दंडात्मक कारवाई करून ती वसूल करणार असल्याचा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. तसेच या प्रकारे नियम बाजूला सारून भूमिगत केबल टाकणाऱ्या आणखी काही कंपन्या आहेत का याचा देखील शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार असल्याचा इशारा भिमाले यांनी यावेळी दिला.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: