PMC Birth and Death Certificates | जन्म मृत्यूचे दाखले हे केवळ संबंधित क्षेत्रिय कार्यालयातच मिळणार | महापालिका आरोग्य विभागाची माहिती 

HomeBreaking Newsपुणे

PMC Birth and Death Certificates | जन्म मृत्यूचे दाखले हे केवळ संबंधित क्षेत्रिय कार्यालयातच मिळणार | महापालिका आरोग्य विभागाची माहिती 

गणेश मुळे Jul 09, 2024 3:05 PM

Balbharti – Paud Fata Road |  Balbharti-Poud Phata road has no access road   |  Explanation of Pune Municipal Administration
Citizen’s of Baner-Balwadi appreciates the Pune Municipal Corporation water supply
Pune Water Cut | येत्या मंगळवारी शहराच्या काही भागातील पाणीपुरवठा राहणार बंद!

PMC Birth and Death Certificates | जन्म मृत्यूचे दाखले हे केवळ संबंधित क्षेत्रिय कार्यालयातच मिळणार | महापालिका आरोग्य विभागाची माहिती

PMC Birth and Death Registration – (The Karbhari News Service) – संगणक प्रणालीनुसार सद्यास्थितीत जन्म मृत्यूचे दाखले हे केवळ संबंधित क्षेत्रिय कार्यालयाकडील उपनिबंधक तथा क्षेत्रिय वैद्यकीय अधिकारी यांच्या कार्यालयाकडूनच वितरीत करण्यात येतील. अशी माहिती प्रभारी आरोग्य अधिकारी डॉ कल्पना बळिवंत (Dr Kalpana Baliwant PMC) यांनी दिली आहे. (PMC Health Department)
पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य कार्यालयाकडील जन्म मृत्यू नोंदणी कार्यालयामार्फत जन्म मृत्यू नोंदणीचे कामकाज हे 1 मार्च 2019 पासून केंद्र शासनाने विकसित केलेल्या CRS नागरी नोंदणी पद्धतीने 15 क्षेत्रिय कार्यालय स्तरावर उपनिबंधक तथा क्षेत्रिय वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्फत करण्यात येते. केंद्र शासनाने विकसित केलेल्या सुधारित CRS नागरी नोंदणी पद्धती 24 जून 2024 पासून अद्यावत करण्यात आले असून सदर संगणक प्रणालीनुसार सद्यास्थितीत जन्म मृत्यूचे दाखले हे केवळ संबंधित क्षेत्रिय कार्यालयाकडील उपनिबंधक तथा क्षेत्रिय वैद्यकीय अधिकारी यांच्या कार्यालयाकडूनच वितरीत करण्यात येतील. याबाबत केंद्र शासनाकडे पत्रव्यवहार केला असून पुढील सुचना प्राप्त झाल्यास कळविण्यांत येईल. असे डॉ बळिवंत यांनी म्हटले आहे.

| सुधारित संगणक प्रणालीमधून सद्यस्थितीत जन्म-मृत्यूचे दाखले वितरणाबाबत नियमावली

१)मार्च २०१९ नंतरचे जन्म-मृत्यूचे दाखले केवळ संबंधित उपनिबंधक तथा क्षेत्रिय वैद्यकीय अधिकारी जन्म-मृत्यू विभाग यांच्या कार्यालयामध्ये प्राप्त होतील.
२)अॅप्रुव्हल क्लार्क यांनी जन्म/मृत्यू दाखले बाबत नागरिकांकडून अर्ज घेऊन त्याच्यावरती संबंधित दाखल्याचा नोंदणी क्रमांक लिहावा.
३)सदर अर्ज नागरिकाने नागरी सुविधामध्ये सादर करून आवश्यक शुल्क भरावे
४)आवश्यक शुल्क भरलेली पावती प्राप्त झाल्यानंतर अॅप्रुव्हल क्लार्क यांनी जन्म-मृत्यूचे दाखले वितरीत करावे.
५)जन्म-मृत्यू दाखले वितरणासाठी लागणारी स्टेशनरी नागरी सुविधा केंद्रामार्फत उपलब्ध करून घ्यावी.
६)वितरीत करण्यात येणाऱ्या जन्म मृत्यू दाखल्यांचा अहवाल दररोज नोंदवहीत अद्यावत करून त्याचा मासिक अहवाल या कार्यालयास सादर करावा.
७)याबाबत केंद्र शासनाकडे पत्रव्यवहार केला असून पुढील सुचना प्राप्त झाल्यास याबाबत कळविण्यात येईल.
८) मार्च २०१९ पूर्वीचे व समाविष्ट गावांतील २०२१ पूर्वीचे जन्म- मृत्यूचे दाखले हे पूर्वीप्रमाणेच नागरी सुविधा केंद्रामार्फत वितरीत करण्यात येतील.