PMC Biomining Project | देवाची उरुळी डेपोतील बायोमायनिंगचे काम शास्त्रोक्त पद्धतीने लवकर पूर्ण करा | आयुक्तांचे आदेश

Homeadministrative

PMC Biomining Project | देवाची उरुळी डेपोतील बायोमायनिंगचे काम शास्त्रोक्त पद्धतीने लवकर पूर्ण करा | आयुक्तांचे आदेश

Ganesh Kumar Mule May 29, 2026 8:55 PM

PMC Deputy Commissioner | कर आकारणी आणि कर संकलन विभाग आता रवी पवार यांच्याकडे, अरविंद माळी यांच्याकडे आपत्ती व्यवस्थापन तर आशा राऊत यांच्याकडे मध्यवर्ती भांडार विभाग 
Pune Water Supply News | पाणीकपातीमुळे टँकरची संख्या १४०० वरून १७०० वर | पाणी वितरण व्यवस्थेत मोठ्या कामाची गरज  | महापालिका प्रशासनाचा मुख्य सभेत खुलासा
PMC Commissioner Naval Kishore Ram | महापलिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी दाखवली एकजूट  | आयुक्त राम यांच्या समर्थनार्थ काळ्या फिती लावून निषेध आंदोलन 

PMC Biomining Project| देवाची उरुळी डेपोतील बायोमायनिंगचे काम शास्त्रोक्त पद्धतीने लवकर पूर्ण करा | आयुक्तांचे आदेश

| महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांची कचरा डेपोला भेट

 

Naval Kishore Ram IAS – (The Karbhari News Service) –  देवाची उरुळी येथील घनकचरा व्यवस्थापन डेपोमध्ये साचलेल्या जुन्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी सुरू असलेले ‘बायोमायनिंग’ प्रकल्पाचे काम घनकचरा व्यवस्थापन नियमातील तरतुदींनुसार शास्त्रोक्त पद्धतीने व निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिल्या. आयुक्तांनी प्रत्यक्ष डेपोला भेट देऊन कामाची पाहणी केली व स्थानिक नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. (PMC Solid Waste Management Department)

जुन्या डम्पिंग ग्राऊंडवर वर्षानुवर्षे साचलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यांवर प्रक्रिया करून जागा मोकळी करण्याची पद्धत म्हणजे बायोमायनिंग. यामध्ये जुना कचरा खोदून काढला जातो, त्याचे जैविक, अजैविक, प्लास्टिक, आरडीएफ, माती असे वर्गीकरण करून त्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया केली जाते. केंद्र सरकारच्या घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ नुसार सर्व महानगरपालिकांना त्यांच्या हद्दीतील जुने डम्पिंग ग्राऊंड बायोमायनिंगद्वारे मोकळे करणे बंधनकारक आहे.

आयुक्तांनी दिल्या ‘या’ सूचना

देवाची उरुळी डेपोमुळे परिसरातील नागरिकांना दुर्गंधी, प्रदूषित हवा व भूजलाचा प्रश्न भेडसावत आहे. या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी पाहणी दरम्यान खालील सूचना केल्या:  शास्त्रोक्त पद्धत सक्तीची: बायोमायनिंगचे काम घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ मध्ये नमूद केलेल्या शास्त्रोक्त पद्धतीनेच करावे. नियमांचे उल्लंघन खपवून घेतले जाणार नाही.  कामाला गती द्या: डेपोवरील लाखो टन जुन्या कचऱ्यावर प्रक्रिया करून जागा मोकळी करण्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, जेणेकरून स्थानिकांना दिलासा मिळेल.  पर्यावरणाची काळजी घ्या: प्रकल्प राबवताना हवेचे व पाण्याचे प्रदूषण होणार नाही याची दक्षता घ्यावी. दुर्गंधी नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात.

देवाची उरुळी व फुरसुंगी परिसरातील नागरिकांनी आयुक्तांसमोर कचरा डेपोमुळे होणाऱ्या त्रासाचा पाढा वाचला. “कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे प्रचंड दुर्गंधी सुटते. पावसाळ्यात परिस्थिती आणखी बिकट होते. भूजल दूषित झाल्याने आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत,” अशी कैफियत स्थानिकांनी मांडली.

या पाहणी दौऱ्याप्रसंगी अतिरिक्त महापालिका आयुक्त (इस्टेट) प्रजित नायर, उपआयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) संतोष वारुळे, महापालिका सहाय्यक आयुक्त प्रज्ञा पोतदार, कैलास केंद्रे तसेच घनकचरा व्यवस्थापन विभागाकडील अधिकारी उपस्थित होते. याशिवाय देवाची उरुळी फुरसुंगी नगरपरिषदेचे स्थानिक लोकप्रतिनिधी व मोठ्या संख्येने नागरिकही उपस्थित होते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0