PMC Labour Welfare | पुणे महापालिकेचा संवेदनशील व ऐतिहासिक निर्णय | कर्तव्यावर मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना ५ लाखांची मदत

Homeadministrative

PMC Labour Welfare | पुणे महापालिकेचा संवेदनशील व ऐतिहासिक निर्णय | कर्तव्यावर मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना ५ लाखांची मदत

Ganesh Kumar Mule May 29, 2026 8:32 PM

PMC Solid Waste Management | पुणे महानगरपालिकेच्या कचरा प्रक्रिया क्षमतेत वाढ करण्यावर भर! | महापालिका आयुक्त यांची देवाची उरुळी कचरा डेपो,  बायोमायनिंग प्रकल्पास भेट
Pune PMC News | विमानतळ आणि आसपासच्या परिसरात विमानतळ प्राधिकरण व पुणे महानगरपालिका यांची एकत्रित पाहणी 
PMC Medical College | महापालिका मेडिकल कॉलेजच्या अधिष्ठाता पदी  डॉ. सुनीता सावंत 

PMC Labour Welfare | पुणे महापालिकेचा संवेदनशील व ऐतिहासिक निर्णय | कर्तव्यावर मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना ५ लाखांची मदत

| देशात बहुदा पहिलाच धोरणात्मक निर्णय

Naval Kishore Ram IAS  – (The Karbhari News Service – आपल्या कर्मचाऱ्यांप्रती सामाजिक व नैतिक बांधिलकी जपत पुणे महानगरपालिकेने एक संवेदनशील व ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. कर्तव्यावर असताना दुर्दैवी मृत्यू ओढवलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या पात्र वारसांना ५ लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्याचे धोरण महापालिकेने मंजूर केले आहे. आपल्या कर्मचाऱ्यांना असे ‘हक्काचे आर्थिक कवच’ देणारी पुणे महापालिका ही देशातील पहिलीच महापालिका ठरली आहे.  (Nitin Kenjale PMC)

नव्या धोरणाची पहिली अंमलबजावणी

या नव्या धोरणाची अंमलबजावणी करत आज दि. २९ मे  रोजी कर्तव्यावर असताना दिवंगत झालेल्या दोन कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना दिलासा देण्यात आला. कै. अशोक वाळके यांच्या पत्नी श्रीमती कविता वाळके व कै. शशिकांत दिघे यांच्या पत्नी श्रीमती राजश्री दिघे यांना महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या हस्ते प्रत्येकी ५ लाख रुपयांचा धनादेश सन्मानपूर्वक सुपूर्द करण्यात आला.

कुटुंबाचा आधारस्तंभच हरपल्याच्या दुःखद प्रसंगी महापालिकेने दाखवलेल्या या तत्परतेमुळे दिवंगत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना मोठा आर्थिक व मानसिक आधार मिळाला आहे. “महापालिका फक्त कागदावरची यंत्रणा नाही, तर एक कुटुंब आहे, याची प्रचिती आज आली,” अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

या कार्यक्रमास मुख्य कामगार अधिकारी नितीन केंजळे, उप कामगार अधिकारी बुगाप्पा कोळी यांच्यासह दिवंगत कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. आयुक्तांनी यावेळी दोन्ही कुटुंबियांचे सांत्वन करून महापालिका सदैव त्यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही दिली.

कर्मचाऱ्यांप्रती संवेदनशीलता

शहराच्या सेवेसाठी अहोरात्र झटणाऱ्या कर्मचाऱ्यांचा कर्तव्यावर असताना अपघाती किंवा नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळतो. अशा वेळी आर्थिक विवंचनेत भरडणाऱ्या कुटुंबाला तातडीने मदत मिळावी, या उद्देशाने हे धोरण आणण्यात आले आहे. या निर्णयामुळे महापालिकेची कर्मचाऱ्यांप्रती असलेली संवेदनशीलता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
पुणे महापालिकेच्या या निर्णयाचे सर्व स्तरांतून स्वागत होत असून, इतर महापालिका व शासकीय संस्थांसाठी हा निर्णय आदर्शवत ठरणार आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: