PMC Assistant Sports Officer | सहाय्यक क्रीडा अधिकारी पदावर यांना मिळाली पदोन्नती   | अतिरिक्त आयुक्तांनी जारी केले आदेश 

Homeadministrative

PMC Assistant Sports Officer | सहाय्यक क्रीडा अधिकारी पदावर यांना मिळाली पदोन्नती | अतिरिक्त आयुक्तांनी जारी केले आदेश 

Ganesh Kumar Mule Jan 15, 2025 9:01 PM

Eknath Shinde Foundation | दोन्ही फुफ्फुस निकामी झालेल्या शेतमजूर गरीब मुलीच्या मदतीला धावून आले एकनाथ शिंदे फाउंडेशन..!!
Khadakwasla Dam | खडकवासला धरणाचे पाणी दूषित असल्याचे राज्य सरकारने देखील केले मान्य | पुणेकरांसाठी धोक्याची घंटा
Pune DPDC | उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न | ‘जीबीएस’ आजाराबाबत घेतला आढावा

PMC Assistant Sports Officer | सहाय्यक क्रीडा अधिकारी पदावर यांना मिळाली पदोन्नती

| अतिरिक्त आयुक्तांनी जारी केले आदेश

 

PMC Assistant Sports officer- (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेत (Pune Municipal Corporation- PMC) बऱ्याच वर्षांपासून रखडलेल्या सहाय्यक क्रीडा अधिकारी पदी पदोन्नती देण्यास अखेर मुहूर्त मिळाला आहे. ज्येष्ठते नुसार सोनाली कदम (Sonali Kadam PMC) यांना या पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. महापालिका अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी पी यांनी या बाबतचे आदेश जारी केले आहेत. (Pune PMC News)

क्रीडा सेवा श्रेणी -3 या संवर्गातील सहाय्यक क्रीडा अधिकारी हे पद पुणे महापालिकेत दोन माध्यमातून भरण्यात येते. एक म्हणजे 50% नामनिर्देशन आणि दुसरे 50% पदोन्नती. विहित शैक्षणिक धारणा आणि अटी शर्ती पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना या पदावर पदोन्नती दिली जाते. दरम्यान गेल्या बऱ्याच वर्षांपासून पदोन्नती ने पद भरण्यासाठी मंजूरी मिळत नव्हती. अखेर 5 सप्टेंबर 2023 ला तत्कालीन आयुक्तांनी पदोन्नती ने पद भरण्यासाठी मान्यता दिली होती. तरीही ही प्रक्रिया पुढे सरकत नव्हती.

अखेर पदोन्नती ने पद भरण्यासाठी प्रशासनाला मुहूर्त मिळाला होता. त्यानुसार याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली होती आणि कर्मचाऱ्यांना अर्ज करण्यासाठी 15 जुलै 2024 पर्यंत मुदत देण्यात आली होती. सामान्य प्रशासन विभागाकडे हे अर्ज सादर करण्यात आले होते. तसेच पद भरताना सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचा विचार केला जाणार होता. त्यानुसार पात्रतेनुसार सोनाली कदम यांना ही पदोन्नती देण्यात आली आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0