Pune PMC News | आकांक्षा फाऊंडेशन  सोबत 9 वर्षांऐवजी  प्रायोगिक तत्त्वावर 3 वर्षांचा करार | सभागृह नेते गणेश बिडकर यांची माहिती 

Homeadministrative

Pune PMC News | आकांक्षा फाऊंडेशन  सोबत 9 वर्षांऐवजी  प्रायोगिक तत्त्वावर 3 वर्षांचा करार | सभागृह नेते गणेश बिडकर यांची माहिती 

Ganesh Kumar Mule Jun 15, 2026 9:31 PM

Maharashtra Cabinet Meeting | मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे ४ निर्णय जाणून घ्या!
PMC Property Tax Bills | मिळकत कराच्या बिलाबाबत आणि ४० टक्के सवलती बाबत प्रशासनाने दिली ही माहिती 
Municipality for Fursungi-Uruli Devachi | फुरसुंगी-उरुळी गावांसाठी नवीन नगरपालिका | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय

Pune PMC News | आकांक्षा फाऊंडेशन  सोबत 9 वर्षांऐवजी  प्रायोगिक तत्त्वावर 3 वर्षांचा करार | सभागृह नेते गणेश बिडकर यांची माहिती

 

PMC Schools – (The Karbhari News Service) –  पुणे महापालिकेने आकांक्षा फाऊंडेशनमार्फत चालवल्या जाणाऱ्या 5 शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी 25 हजार रुपये प्रति विद्यार्थी निधी देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय पुढील तीन वर्षांसाठी प्रायोगिक तत्त्वावर लागू होणार आहे. ही माहिती महापालिकेचे सभागृह नेते गणेश बिडकर यांनी दिली. (PMC House Leader Ganesh Bidkar)

दरम्यान पुणे महापालिकेच्या 5 इंग्रजी माध्यम शाळा पुढील 9 वर्षे PPP तत्त्वावर चालवण्याच्या आकांक्षा फाउंडेशनच्या प्रस्तावावर स्थायी समितीने ब्रेक लावला होता. थेट स्थायी समितीकडे आलेला प्रस्ताव  फेरविचार करून आधी शिक्षण समितीकडे देण्याचे आदेश समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिले होते.  प्रति विद्यार्थी 25 हजार रुपये प्रमाणे सुमारे 4500 विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी 11.25 कोटी आणि 9 वर्षांत एकूण 101.25 कोटी रुपये खर्चाचा हा प्रस्ताव आहे. इतका मोठा आर्थिक भार महापालिकेच्या तिजोरीवर पडणार असल्याने त्यावर फेरविचार होणं गरजेचं आहे. असे भिमाले यांनी सांगितले होते.

दरम्यान यात आता सभागृह नेते गणेश बिडकर यांनी उडी घेतली आहे. बिडकर यांनी सांगितले कि, आकांक्षा फाऊंडेशन 2007 पासून CSR च्या माध्यमातून पुणे शहरात शिक्षणाचे काम करत आहे. सुरुवातीला KC ठाकरे शाळा चालवणाऱ्या या संस्थेकडे सध्या एकूण 5 शाळा असून सुमारे 5 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. गेल्या 10-12 वर्षांपासून संस्था CSR निधीतून शाळा चालवत होती.

विद्यार्थी संख्या वाढल्याने CSR निधी कमी पडत असल्याने संस्थेने महापालिकेकडे निधीसाठी मागणी केली होती. त्यानुसार महापालिकेने टेंडर प्रक्रिया राबवून वाटाघाटी करून प्रति विद्यार्थी 25 हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला.

महापालिकेच्या शाळांमध्ये एका विद्यार्थ्यावर वार्षिक 38 हजार रुपये खर्च होतो. आकांक्षा फाऊंडेशनच्या शाळांमध्ये हा खर्च 55 हजार रुपये आहे. त्यातील 25 हजार रुपये महापालिका देणार असून उर्वरित 30 हजार रुपये संस्थेला CSR च्या माध्यमातून उभे करावे लागणार आहेत.

आकांक्षा फाऊंडेशनच्या शाळांमध्ये सर्वसामान्य कुटुंबातील मुलांचा 98 टक्के निकाल लागतो. तसेच येथून पासआऊट होणाऱ्या 89 टक्के विद्यार्थ्यांनी पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केले आहे. संस्थेच्या या कामगिरीमुळे महापालिकेने त्यांना साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. असे बिडकर यांनी सांगितले.

महापालिका आणि CSR च्या माध्यमातून असा प्रकल्प राबवण्याचा हा महाराष्ट्रातील पहिलाच प्रयोग आहे. महापौरांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेच्या शाळांमधील शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी अभ्यासगटही स्थापन करण्यात येणार आहे. हा निर्णय 9 वर्षांऐवजी 3 वर्षांसाठी प्रायोगिक तत्त्वावर राबवण्यात येणार असून, यशस्वी झाल्यास इतर संस्थांनाही यात सहभागी करून घेण्याचा महापालिकेचा मानस आहे. असे देखील गणेश बिडकर यांनी सांगितले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: