पिंपरी मनपाच्या निवडणुकीचे बिगुल वाजले!
:पुण्याचे कधी वाजणार?
पुणे : पिंपरी-चिंचवड महापालिका(PCMC) निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा आगामी निवडणुकीसाठीचा प्रारुप प्रभाग रचनेचा आराखडा 1 फेब्रुवारी 2022 रोजी प्रसिद्ध होणार आहे. त्यावर 1 ते 14 फेब्रुवारी दरम्यान हरकती सूचना मागविल्या जाणार आहेत. पुणे महापालिकेची(Pune Municipal Corporation) प्रभाग रचना हि १ फेब्रुवारी लाच जाहीर होण्याची शक्यता आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवच्या प्रभाग रचनेसाठी प्राप्त हरकती 16 फेब्रुवारी रोजी आयोगाला सादर कराव्या लागणार आहेत. 26 फेब्रुवारी रोजी या हरकतीवर सुनावणी घेण्यात येईल. सुनावणीनंतर प्राधिकृत अधिकाऱ्यांनी केलेल्या शिफारसी 2 मार्च 2022 रोजी निवडणूक आयोगाला(State Election Commission) पाठवावे लागणार आहे. आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी हा कार्यक्रम महापालिकेला पाठविला आहे.
पुण्याच्या प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा निवडणूक आयोगाला सादर करण्यात आला आहे. आयोगाने सांगितले आहे कि अगोदर प्रभाग रचना जाहीर होणार. त्यांनतर निवडणुकीचा कर्यक्रम असेल. त्यानुसार पुण्याच्या प्रभाग रचनेची उत्सुकता सर्वांना आहे.
COMMENTS