Nirbhay Bano sabha Pune | निर्भय बनो सभेवरून पुणे कॉंग्रेस चे पुणे भाजपला आव्हान! 

HomeBreaking Newsपुणे

Nirbhay Bano sabha Pune | निर्भय बनो सभेवरून पुणे कॉंग्रेस चे पुणे भाजपला आव्हान! 

गणेश मुळे Feb 08, 2024 2:40 PM

Pune Zilha Sahkari Dudh Utpadak Sangh | Mahavikas Aghadi Pune | क्रीडांगण आरक्षणा वरून महाविकास आघाडी उद्या करणार आंदोलन 
Pune Congress | Vidhansabha Election 2024 | विधानसभा निवडणुकीसाठी पुणे काँग्रेस इच्छुकांकडून मागवणार अर्ज! | 5 ऑगस्ट पर्यंत मुदत
Pune News | महिलांवरील अत्याचारांचे विरोधात महाविकास आघाडी आक्रमक |  सुप्रियाताई सुळे यांच्या नेतृत्वात तीव्र आंदोलन

Nirbhay Bano sabha Pune | निर्भय बनो सभेवरून पुणे कॉंग्रेस चे पुणे भाजपला आव्हान!

 

Nirbhay Bano Sabha Pune | निखिल वागळे(Nikhil Wagle), अमोल पालेकर (Amol Palekar), असीम सरोदे (Asim Sarode) यांच्या उपस्थितीत उद्या पुण्यात निर्भय बनो सभा (Nirbhay Bano sabha pune) घेतली जाणार आहे. मात्र निखिल वागळे यांच्या उपस्थित राहण्याबाबत शहर भाजपने (Pune BJP) आक्षेप घेतला आहे. तसेच सभा उधळून लावण्याचा इरादा भाजप शहर अध्यक्ष धीरज घाटे यांनी व्यक्त केला आहे. मात्र भाजपचे हे आव्हान शहर कॉंग्रेस (Pune Congress) ने स्वीकारले आहे. उद्याची सभा ही यशस्वीरित्या पार पडेल याची आम्ही पूर्ण तयारी केली आहे. अशी खात्री पुणे कॉंग्रेस ने दिली आहे.

  • भाजपने काय म्हटले होते?

देशाचे लाडके पंतप्रधान  नरेंद्रभाई मोदी यांच्याबद्दल कायम अवमानकारक वक्तव्ये करणारे, देशाची माजी उपपंतप्रधान  लालकृष्ण अडवाणी जी यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार जाहीर झाल्यानंतर आडवाणी यांना भारतरत्न म्हणजे एका दंगलखोराने दुसऱ्या दंगलखोराला शाबासकी देण्यासारखे आहे. अशी आपल्या मनातील मळमळ ओकून समाजातील वातावरण कलुषित करणारे काही नतद्रष्ट लोक येत्या ९ फेब्रुवारी २०२४ रोजी पुण्यातील साने गुरुजी स्मारक येथे ‘निर्भय बनो’ नावाची सभा घेणार आहेत.

गेल्या दहा वर्षात नरेंद्रभाई मोदी  यांच्या नेतृत्त्वाखाली देशाचा वेगाने विकास होतो आहे. जगभरात मोदी जींच्या नावाचे कौतुक केले जात आहे. पण हे सगळं बघून काही लोकांच्या पोटात दुखते आहे. त्यामुळे जाणीवपूर्वक देशातील घटनात्मक पदांवर असणाऱ्या नेत्यांची बदनामी या सभेच्या माध्यमातून केली जाते. या सभेत सहभागी होणारे वक्ते त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरूनही कायम गरळ ओकत असतात.
अडवाणी  यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाल्यानंतरही या निवडक लोकांनी अत्यंत खालच्या पातळीवर उतरून देशातील या सर्वोच्च सन्मानाचा अनादर केला होता. त्याचबरोबर मोदी  आणि अडवाणी  यांचा अपमान केला होता.

निर्भय बनो सभेच्या माध्यमातून समाजात तेढ निर्माण करणे आणि त्यातून आपली राजकीय पोळी भाजून घेणे एवढे एकच उद्दिष्ट आयोजकांचे आहे. भारतीय जनता पार्टी या स्वरुपाच्या समाजात तेढ निर्माण करणाऱ्या, दुही माजवणाऱ्या प्रवृत्तींच्या कायमच विरोधात उभी राहिली आहे. खोटं बोल पण रेटून बोल ही संस्कृती निर्भय बनोच्या नावाखाली रुजविण्याची वृत्ती यातील वक्त्यांकडून सुरू आहे. पण पुणे शहर भारतीय जनता पार्टी हे सहन करणार नाही.
देशविघातक वक्तव्ये करणाऱ्यांना वेळीच आळा घालण्यासाठी आपण निर्भय बनो सभेला परवानगी देऊ नये, अशी मागणी या पत्राच्या माध्यमातून आम्ही करतो आहोत. देशात भयमुक्त वातावरण असताना चार टाळकी निर्भय बनो म्हणून आपला अजेंडा रेटत आहेत. त्यांचा हा अजेंडा उधळून लावल्याशिवाय पुणे शहर भारतीय जनता पार्टी शांत राहणार नाही.

  • कॉंग्रेस ने काय म्हटले आहे?

‘निर्भय बनो’ ची उद्या शुक्रवार  रोजी होणारी सभा ही गुंडशाही व झुंडशाहीच्या विरोधात घेतली आहे. परंतु  भारतीय जनता पार्टीचे अतिशय संस्कारी अध्यक्ष धीरज घाटे यांनी ही सभा उधळवून लावायची धमकी दिली आहे आणि तसे त्यांनी तेथील पोलीस स्टेशनला निवेदनही दिले आहे. खरे तर आता नविन पोलीस आयुक्त अमितेश कुमार हे आले आहेत आणि ते कायदा व सुव्यवस्था या बाबत अतिशय दक्ष आहेत. त्यांनी पुण्यातील गावगुंड ते मोठे गुंड सगळ्यांची परेड पोलीस आयुक्तालय येथे काढली होती. त्यामुळे या धर्मांध गुंडाचा बंदोबस्त पोलीस आयुक्त निश्चित करतीलच परंतु या सभेसाठी इंडिया आघाडीमधील सर्व घटक पक्ष व महाविकास आघाडी हे तेथे लोकशाही वाचविण्यासाठी आणि ‘निर्भय बनो’ सभा ही व्यवस्थित पणे पार पाडण्यासाठी संरक्षण देण्याचे काम करणार आहेत.

     खरे तर संविधानाने आपल्याला आपले मत मांडण्याचा अधिकार, भाषणाचा अधिकार दिलेला आहे. असे असतानाही काही संविधान विरोधी लोक गुंडशाही व झुंडशाहीच्या माध्यमातून पुण्यातील वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करीत आहेत तो प्रयत्न आम्ही कदापीही यशस्वी होवू देणार नाही. लोकशाही ही असल्या धमक्यांना घाबरता नाही. उद्याची सभा ही यशस्वीरित्या पार पडेल याची आम्ही पूर्ण तयारी केली आहे. अशी माहिती पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी या पत्रकाद्वारे दिली आहे.