NCP Youth Congress | राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून नौकरी महोत्सवाचे आयोजन

HomeBreaking Newsपुणे

NCP Youth Congress | राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून नौकरी महोत्सवाचे आयोजन

गणेश मुळे Aug 01, 2024 3:37 PM

DCM Ajit Pawar | सावित्रीबाई फुले स्मारक आणि जलतरण तलावासाठी विद्यापीठाला १० कोटी रुपयांचा निधी-उपमुख्यमंत्री अजित पवार
Vaccination : Ajit pawar : लसीकरण वाढविण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा : अजित पवार यांचे आवाहन 
Pune Water Crisis | पुणे महापालिकेला दररोज किमान 50 MLD पाणी बचत करावी लागणार!

NCP Youth Congress | राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून नौकरी महोत्सवाचे आयोजन

 

Sameer Chandere – (The Karbhari News Service) –  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पुणे शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे शहराच्या सर्व विधानसभा मतदार संघात नोकरी महोत्सव व शाखा उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम 3 ऑगस्ट ते 18 ऑगस्ट दरम्यान आयोजित केला जाणार आहे, अशी माहिती पुणे शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष समीर चांदेरे यांनी दिली. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे विभाग अध्यक्ष राकेश कामटे, शहराचे कार्याध्यक्ष मनोज पाचपुते, महिला अध्यक्ष गौरी जाधव आदी उपस्थित होते. (Ajit Pawar Birthday)

यावेळी चांदेरे म्हणाले की प्रत्येक मतदारसंघात नौकरी मेळावा घेण्यात येणार आहे. अजित पवार यांनी अर्थसंकल्पात युवकांसाठी अनेक महत्वाचे निर्णय घेतले. अजित पवार यांची प्रेरणा घेऊन युवक काँग्रेस ने पुणे शहरात विविध तालुक्यातून आलेल्या युवकांसाठी नौकरी मेळाव्याचे आयोजन केले आहे.

कार्यक्रमाची माहिती देताना मनोज पाचपुते म्हणाले, शहरात एकुण 10 मेळाव्याचे आयोजन केले आहे. या माध्यमातून 10 हजार युवकांना रोजगार मिळणार आहे. या मेळाव्यात पुणे परिसरातील 350 पेक्षा जास्त कंपन्या सहभागी होणार आहे. यामध्ये बजाज, टाटा ग्रूपच्या कंपन्या, आयटी कंपन्या मध्ये नोकरीची संधी मिळणार आहे.

संधी उपलब्ध करुन देण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष  अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने शहरात प्रत्येक विधानसभानिहाय “राष्ट्रवादी युवा नोकरी मेळावा २०२४” आयोजित करत असून, याबाबत आज पत्रकार परिषद घेवून माध्यम प्रतिनिधींना माहिती दिली.

यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसची पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राकेश कामठे, महिला कार्यध्यक्ष गौरी ताई जाधव,पुणे शहर युवक कार्याध्यक्ष मनोज पाचपुते, मनोज बालवडकर,सुरज गायकवाड,निखिल शर्मा,सागर चंदनशिवे,ऋतुराज पन्हाळकर,विशाल चौघुले यांच्यासह विधानसभेमधील युवक अध्यक्ष गजानन लोंढे, प्रसाद चौगुले, सुशांत ढमढेरे, गणेश झांबरे, श्रीधर स्वामी, अजय साबळे उपस्थित होते.