NCP Pune | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहराचे अध्यक्ष व कार्याध्यक्ष जाहीर!

HomeBreaking News

NCP Pune | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहराचे अध्यक्ष व कार्याध्यक्ष जाहीर!

Ganesh Kumar Mule Jun 01, 2025 3:45 PM

Salary issue of teachers : राज्यातील शिक्षकांच्या वेतनप्रश्नांसदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले ‘हे’ निर्देश
E Bus : PMPML : पीएमपीएमएलच्या ‘ई-बस’ ने गाठला अडीच कोटी किमी धावेचा टप्पा : सिंहगड ई-बस सेवेचा शुभारंभ
Mahavikas Aghadi | Sinet Election | विद्यापीठाची परीक्षा पद्धती अधिकाधिक पारदर्शक करणार | अजित पवार

NCP Pune | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहराचे अध्यक्ष व कार्याध्यक्ष जाहीर!

 

Pune NCP City President – (The Karbhari News Service) – पुणे शहराचे पूर्व पुणे व पश्चिम पुणे असे दोन भाग करून प्रत्येक भागासाठी एक शहराध्यक्ष व दोन कार्याध्यक्ष अशी रचना राष्ट्रवादी कॉंग्रेस च्या वतीने करण्यात आली आहे. अशी माहिती आमदार चेतन तुपे (MLA Chetan Tupe) यांनी दिली. (Pune News)

पूर्व पुणे – पुणे शहराचे पूर्व पुणे यामध्ये कसबा कॅन्टोन्मेंट हडपसर व वडगाव शेरी मतदारसंघाचा समावेश करण्यात आला आहे. या चार मतदारसंघाला पूर्व पुणे म्हणून संबोधण्यात आले आहे. पूर्व पुण्याच्या शहराध्यक्षपदी माजी आमदार सुनील टिंगरे यांची शहराध्यक्षपदी निवड तर कार्याध्यक्षपदी श्रीमती रूपाली ठोंबरे व दुसरे कार्याध्यक्ष म्हणून हाजी फिरोज शेख यांची निवड करण्यात आली आहे. दरम्यान दीपक मानकर यांच्याकडून पद काढून घेतल्यानंतर आता त्यांना कुठली जबाबदारी दिली जाणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

पश्चिम पुणे – पुणे शहराच्या पश्चिम पुण्यामध्ये पर्वती खडकवासला कोथरूड व शिवाजीनगर या चार विधानसभा मतदारसंघाचा समावेश करण्यात आला आहे.

या चार मतदारसंघाला पश्चिम पुणे म्हणून संबोधित करण्यात आले आहे.  पश्चिम पुण्याच्या शहराध्यक्षपदी सुभाष जगताप यांची निवड तर कार्याध्यक्षपदी प्रदीप देशमुख यांची फेरनिवड व दुसरे कार्याध्यक्ष म्हणून श्री अक्रूर कुदळे यांची निवड करण्यात आली आहे.

या निवडीची घोषणा आज उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केली व या सर्वांची नियुक्तीपत्रे प्रांताध्यक्ष  सुनील तटकरे यांनी दिली आहेत.

अजितदादांच्या सूचनेवरून आमदार चेतन तुपे यांनी ही नावे जाहीर केली आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: