Naval Kishor Ram IAS | पुणे महापालिका क्षेत्राच्या समस्या सोडविण्यासाठी सकारात्मक धोरण ठेवण्याबाबत सूचना | चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून नवनियुक्त आयुक्त नवलकिशोर यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा
Chandrakant Patil – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेचे 38 वे आयुक्त म्हणून नवलकिशोर राम यांनी पदभार स्वीकारला. त्याबद्दल राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या. महापालिका क्षेत्राच्या सर्वसमावेशक विकासासोबत; समस्या सोडविण्यासाठी सकारात्मक धोरण ठेवण्याबाबत सूचित केले. (Pune Municipal Corporation – PMC)
यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी., ओमप्रकाश दिवटे, भाजप पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे, आ. भीमराव तापकीर, हेमंत रासने, माजी नगरसेवक गणेश बिडकर, श्रीनाथ भिमाले, राजू शिळीमकर, वर्षाताई तापकीर, दीपक पोटे, गणेश कळमकर, प्रमोद कोंढरे, राहुल भंडारे, रविंद्र साळेगावकर, महेश पुंडे, सुभाष जंगले आदी उपस्थित होते.
COMMENTS