DCM Eknath Shinde Birthday | पुण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ६१ किलो लाडू मोदक अर्पण व श्रीमंत दगडूशेठ गणपती महाआरतीचे आयोजन!

HomeBreaking News

DCM Eknath Shinde Birthday | पुण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ६१ किलो लाडू मोदक अर्पण व श्रीमंत दगडूशेठ गणपती महाआरतीचे आयोजन!

Ganesh Kumar Mule Feb 09, 2025 5:07 PM

Shivsena Pune | उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात पुणे महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवणार – शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे
DCM Eknath Shinde | विविध विकासकामांच्या भूमिपूजनासाठी उपमुख्यमंत्री पुण्यात येणार – शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे | उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस अनोख्या सामाजिक उपक्रमांनी साजरा होणार
DCM Eknath Shinde | नगर विकास विभाग हा महाराष्ट्राच्या विकासाचा कणा- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

DCM Eknath Shinde Birthday | पुण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ६१ किलो लाडू मोदक अर्पण व श्रीमंत दगडूशेठ गणपती महाआरतीचे आयोजन!

 

Pramod Nana Bhangire – (The Karbhari News Service)- आज महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे शहर शिवसेनेच्या वतीने पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात विशेष महाआरती आणि ६१ किलो लाडू मोदक अर्पण करण्याचा पवित्र सोहळा संपन्न झाला. (Pune Shivsena)

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ६१ व्या वाढदिवसानिमित्त ६१ किलो लाडू मोदकाचा विशेष नैवेद्य श्री गणरायाला अर्पण करून त्यांच्या उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि महाराष्ट्राच्या समृद्धीची प्रार्थना करण्यात आली शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या वतीने गणरायाला ६१ किलो मोदकाचा लाडू अर्पण करण्यात आला. शिवसेनेतर्फे आज संपूर्ण शहरात “कॉमन मॅन दिवस” साजरा करीत रक्तदान शिबिरे, मोफत आरोग्य तपासणी, अन्नदान, वृक्षारोपण आणि विशेष महाआरतीसह विविध उपक्रमांचेही आयोजन करण्यात आले असून या विशेष सोहळ्याला पुणे शहरातील शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी,गणेश भक्त, महिला आघाडी, युवा सेना, नागरिक, पदाधिकारी आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.

गणरायाच्या चरणी मुख्यमंत्री साहेबांसाठी विशेष संकल्पही यावेळी सोडण्यात आला.यावेळी शिवसेना शहरप्रमुख पुणे प्रमोद नाना भानगिरे, सुदर्शनाताई त्रिगुनाईत ,सुरेखा पाटील,श्रुती नाझिरकर,सुनील जाधव,सुधीर कुरुमकर,गौरव साईनकर,गणेश काची,नवनाथ निवंगुने,नितीन लगस,निलेश जगताप,आकाश रेणुसे,समीर नाईक,प्रशांत डाबी,सुहास कांबळे,कौस्तुभ कुलकर्णी,संदीप शिंदे, मंगल सोनटक्के,विशाल गब्दुले,माऊली साळुंखे,दीपक अहिरे, वैजंती फाटे,सविता माने व पुणे शहरातील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0