MNGL | फेक अथवा फ्रॉड कॉल्सवर विश्वास ठेवू नका! | एमएनजीएलचे बिलिंग विभागाचे प्रमुख आनंद जैन यांचे आवाहन

HomeBreaking Newsपुणे

MNGL | फेक अथवा फ्रॉड कॉल्सवर विश्वास ठेवू नका! | एमएनजीएलचे बिलिंग विभागाचे प्रमुख आनंद जैन यांचे आवाहन

गणेश मुळे Apr 06, 2024 12:02 PM

Maharashtra Natural Gas Limited (MNGL) | पुण्यात घरगुती पाईप गॅसची संख्या वाढविण्यासाठी विशेष मोहीम | तुम्हांला कशी मिळेल सेवा? जाणून घ्या
Navale Bridge Accident | नवले पूल परिसर अपघातमुक्त करण्यासाठी सर्व संबंधीत संस्थांची एकत्रित बैठक बोलवा | खासदार सुळे यांची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी
CNG price revision in Pune City 

MNGL | फेक अथवा फ्रॉड कॉल्सवर विश्वास ठेवू नका! | एमएनजीएलचे बिलिंग विभागाचे प्रमुख आनंद जैन यांचे आवाहन

 

MNGL – (The Karbhari News Service) – एमएनजीएलने आपल्या ग्राहकांना सावधगिरीचा इशारा दिला असून, एमएनजीएलने आपल्या ग्राहकांना मोबाईल अँपद्वारे बिलाचे पैसे भरण्याची किंवा अपडेट करण्याची अशी कोणतीही सुविधा उपलब्ध करुन दिलेली नाही. त्यामुळे अशा फेक अथवा फ्रॉड कॉल्सवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन एमएनजीएलचे बिलिंग विभागाचे प्रमुख आनंद जैन यांनी केले आहे.

एमएनजीएलकडे फेक कॉल्ससंदर्भात तक्रारी दाखल झाल्या आहेत. ग्राहकांना फोन करुन ‘मोबाईल लिंक डाऊनलोड करुन पैसे भरा. अन्यथा तुमचे गॅस कनेक्शन बंद करण्यात येईल,’ असे सांगितले जात आहे. यातून एमएनजीलची प्रतिमा मलिन होत आहे. त्यामुळे एमएनजीएलच्या व्यवस्थापनाने सदर बाब अतिशय गांभीर्याने दखल घेतली आहे. तसेच, एमएनजीएलनेही ग्राहकांना सूचित केले आहे.

त्यासोबतच, अशा फेक आणि फ्रॉड कॉल्स संदर्भात एमएनजीएलने १ एप्रिल २०२४ रोजी पुणे पोलिस आयुक्तांकडे तक्रार ही दाखल केली आहे. याशिवाय, एमएनजीएलने आपल्या ग्राहकांना याबाबत जागृत करण्यासाठी आपल्या ऑफिशियल ट्विटर आणि फेसबुक पेजवरुनही ग्राहकांना सूचित केले आहे. त्यासोबतच विविध वृत्तपत्रांमधून जाहीर नोटीस देऊन, रेडिओ जिंगल्सच्या माध्यमातून आणि ग्राहकांना एसएमएस तसेच व्हॉट्सअँपद्वारे संदेश पाठवून जनजागृती करत येत आहे. तसेच, असे प्रकार कोणत्याही ग्राहकासोबत घडत असल्यास, त्यांनी सदर बाब तातडीने पोलिसांच्या निदर्शनास आणून देण्याची विनंती केली आहे.

यासंदर्भात एमएनजीएलजे बिलिंग विभागाचे प्रमुख आनंद जैन यांनी सांगितले आहे की, “एमएनजीएलच्या सर्व ग्राहकांनी तोतयागिरी करुन एमएनजीएलच्या नावाने फसवे कॉल्स करणाऱ्या आणि गॅस बिल भरण्यासाठी काही अँप्स डाऊनलोड करण्यास किंवा लिंकद्वारे विचार करणाऱ्या फसव्या कॉल्सपासून सावध राहावे. एमएनजीएल केवळ देयकावर/बिलावर नमुद केलेल्या बिल प्रदान पद्धतीच्या माध्यमातून म्हणजेत http://www.mngl.in/pay-bill वरुन, भारत बिल पेमेंट सिस्टिम (बीबीपीएस), एनएसीएच, इसीएस, एक्सिस/आयसीआयसीआय बँकच्या शाखेमध्ये धनादेश आणि शिवाजीनगर किंवा चिंचवड येथील एमएनजीएल वॉक-इन सेंटर्समध्ये बिलाची रक्कम स्विकारली जाते. त्यामुळे अशा तोतयागिरीपासून ग्राहकांनी सावध राहावे.”