Khadakwasla Dam Rain | खडकवासला धरण १००% भरले | नदीपात्रात २७,२०३ क्युसेक विसर्ग सुरू
| २४ तासांत धरण साखळीचा साठा १०.६८ टीएमसीवरून १३.९७ टीएमसीवर | पानशेत-वरसगावातही मोठी आवक
Pune Rain – (The Karbhari News Service) – खडकवासला धरण परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुण्याला पाणीपुरवठा करणारी खडकवासला धरण साखळी वेगाने भरत आहे. खडकवासला धरण आज सकाळी १००% भरले असून, सुरक्षिततेच्या कारणास्तव धरणातून नदीपात्रात टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढवत २७,२०३ क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. (Pune Rain News)
धरणनिहाय आकडेवारी – ८ जुलै, सकाळी ६ वाजता
*1) खडकवासला धरण – FULL*
– *२४ तासातील पाऊस*: १०१ मिमी
– *एकूण पाऊस*: ४०५ मिमी
– *पाणीसाठा*: १.९७ टीएमसी – *१००%*
– *आवक*: +१०७९ क्युसेक
– *पाणीपातळी*: ५८२.४७ मीटर
– *विसर्ग*: नदीपात्रात २७,२०३ क्युसेक + NMRBC ला ५० क्युसेक + PMC ला ५०२ क्युसेक
– *आतापर्यंत सांडव्यातून विसर्ग*: ०.२६ टीएमसी
*2) पानशेत धरण*
– *२४ तासातील पाऊस*: १७१ मिमी
– *एकूण पाऊस*: ९२ मिमी
– *पाणीसाठा*: ५.२० टीएमसी – *४५.३६%*
– *आवक*: +१०१ क्युसेक
– *पाणीपातळी*: ६२४.०२ मीटर
*3) वरसगाव धरण*
– *२४ तासातील पाऊस*: १८९ मिमी
– *एकूण पाऊस*: ९० मिमी
– *पाणीसाठा*: ५.८१ टीएमसी – *४५.३६%*
– *आवक*: +१९३ क्युसेक
– *पाणीपातळी*: ६२६.२० मीटर
*4) टेमघर धरण*
– *२४ तासातील पाऊस*: २४५ मिमी
– *एकूण पाऊस*: १०७९ मिमी
– *पाणीसाठा*: ०.९८ टीएमसी – *२६.५०%*
– *आवक*: +३६४ क्युसेक
– *पाणीपातळी*: ६८३.७० मीटर
*एकूण स्थिती*
चारही धरणांमधील *एकूण आवक: ३६३७ दशलक्ष घनफूट*
*एकूण पाणीसाठा: १३.९७ टीएमसी – ४७.९२%*
काल याच वेळी हा साठा १०.६८ टीएमसी होता. म्हणजेच *२४ तासांत ३.२९ टीएमसीने वाढ*.
*गेल्या वर्षी*: १९.५ टीएमसी – ६७.०८%
*खडकवासला धरणातून टप्प्याटप्प्याने वाढवलेला विसर्ग*
धरण १०% भरल्याने प्रशासनाने रात्रीपासून विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढवला आहे.
८/७/२०२६ नदीपात्रातील विसर्ग:*
1. *१२:० – १:० am* = ८४२ क्युसेक
2. *१:०० – १:३० am* = १६८४ क्युसेक
3. *१:३० – २:३० am* = ३४२४ क्युसेक
4. *२:३० – ३:१५ am* = ६६३४ क्युसेक
5. *३:१५ – ३:४५ am* = १४,३९३ क्युसेक
6. *३:४५ – ५:३० am* = २२,८८० क्युसेक
7. *५:३० am पासून* = *२७,२०३ क्युसेक*
*प्रशासनाचा इशारा*
खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्याने *नदीकाठच्या गावांना आणि पुणे शहरातील नदीकाठच्या भागांना सतर्कतेचा इशारा* देण्यात आला आहे. नागरिकांनी नदीपात्रात जाऊ नये, पूल आणि काठावर गर्दी करू नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
पानशेत आणि वरसगाव धरणातही पाण्याची आवक सुरूच असल्याने पुढील २४ तासात विसर्गात आणखी वाढ होऊ शकते. जलसंपदा विभागाकडून परिस्थितीवर २४ तास लक्ष ठेवण्यात येत आहे.

COMMENTS