Mahila Arogya Wari | महिला आरोग्य वारीसाठी विविध उपाययोजना पुरवण्याचे महिला आयोगाचे आदेश!

HomeपुणेBreaking News

Mahila Arogya Wari | महिला आरोग्य वारीसाठी विविध उपाययोजना पुरवण्याचे महिला आयोगाचे आदेश!

गणेश मुळे Jun 01, 2024 11:43 AM

PMC Solid Waste Management | पालखी मुक्कामी असताना आणि पालखी मार्गस्थ झाल्यानंतरही वारकऱ्यांनी आणि पुणेकरांनी अनुभवली स्वच्छता | घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या व्यवस्थापनामुळे शहर राहिले चकाचक  
Palakhi Sohala 2024 | पालखी सोहळ्यात वारकऱ्यांसाठी आवश्यक सुविधांचे नियोजन करा- उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश
Aashadhi Wari 2024 | Sharad Pawar | शरद पवारांसह मान्यवर चालणार एक दिवस वारीत!

Mahila Arogya Wari | महिला आरोग्य वारीसाठी विविध उपाययोजना पुरवण्याचे महिला आयोगाचे आदेश!

Palkhi Sohala 2024 – (The Karbhari News Service) – आषाढी वारी (Aashadhi Wari 2024) कालावधीत महिलांच्या वैयक्तिक स्वच्छतेच्या आणि सुरक्षिततेच्या अनुषंगाने नियोजन करण्यात येत असते. महिला आयोगाकडून महिलांसाठी आरोग्य वारी उपक्रम राबवण्यात येतो. वारी कालावधीत महिला विविध सुविधा पुरवण्याचे आदेश राज्य महिला आयोगाने (Maharashtra State Commission for Women) दिले आहेत. त्यानुसार महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाने (PMC Disaster Management Department) महापालिकेच्या संबंधित विभागांना या सुविधा पुरविण्याचे आदेश दिले आहेत. (Palkhi Sohala 2024)

महाराष्ट्र राज्य महिला आयोग कार्यालयाकडून मागील दोन वर्षांपासून राज्यात वारकरी संप्रदायाचा समृध्द
सांस्कृतिक वारसा लाभलेल्या आषाढी व कार्तिकी वारी कालावधीत पालखी सोहळ्यामध्ये महिलांचा सहभाग
मोठ्याप्रमाणात असल्याने महिलांसाठी आरोग्य वारी हा उपक्रम राबविला जात आहे. संतांनी आपल्या जनजागृती कार्याच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यात आध्यात्मिक लोकशाही स्थापन केली आहे. वारी ही महाराष्ट्रातील एक सांस्कृतिक परंपरा आहे. आषाढी व कार्तिकी वारीच्या निमित्ताने वारकरी महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यातून देहू/आळंदी/पंढरपूर येथे दाखल होत असतात. या वारक-यांमध्ये सहभागी होणा-या
महिलांची संख्या देखील लक्षणीय असते. वारीचा कालावधी बघता वारीमध्ये सहभागी होणा-या महिलांना काही मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देणेबाबत अध्यक्षा, राज्य महिला आयोग यांनी निर्देश दिले आहेत. महिला आयोगाने जिल्हाधिकारी यांना हे आदेश दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी हे आदेश महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाला दिले होते. त्यानुसार आपत्ती व्यवस्थापन विभागाने महापालिकेच्या आरोग्य, पाणीपुरवठा, घनकचरा विभागाला या सुविधा पुरविण्याच्या सूचना दिल्या आहेत.

या सुविधा देण्याचे आदेश

1. वारी काळात दर दहा ते वीस कि.मी. अंतरावर वारकरी महिलांसाठी शौचालय व न्हाणी घराची व्यवस्था असावी.
2. सॅनिटरी नॅपकीन वेंडिंग व सॅनिटरी नॅपकीन बर्निंग मशीन असणे आवश्यक आहे.
3. स्त्रीरोग तज्ज्ञांची सुविधा उपलब्ध करुन देण्यात यावी.
4.  महिला सुरक्षिततेच्या अनुषंगाने महिला हेल्पलाईन क्रमांक मुक्कामाच्या ठिकाणी / मंदिर परिसरात दर्शनी भागात लावण्यात यावेत.
5.  स्तनदामातांसाठी हिरकणी कक्ष उपलब्ध करुन देण्यात यावा.
6. पालखी सोहळ्याकरिता निर्भया पथक तैनात करण्यात यावे, हेल्पलाईन नंबर दर्शनी भागात लावण्यात यावे.