Palkahi Sohala 2024 | पालखी मार्गांवर वारकरी यांना सुविधा उपलब्ध करून देण्याचे महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना आदेश | पालखी मार्गांची अधिकाऱ्या सोबत आयुक्तांची पाहणी 

Homeपुणेsocial

Palkahi Sohala 2024 | पालखी मार्गांवर वारकरी यांना सुविधा उपलब्ध करून देण्याचे महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना आदेश | पालखी मार्गांची अधिकाऱ्या सोबत आयुक्तांची पाहणी 

गणेश मुळे Jun 07, 2024 2:38 PM

Aashadhi Wari 2024 | Sharad Pawar | शरद पवारांसह मान्यवर चालणार एक दिवस वारीत!
PMC Solid Waste Management | पालखी मुक्कामी असताना आणि पालखी मार्गस्थ झाल्यानंतरही वारकऱ्यांनी आणि पुणेकरांनी अनुभवली स्वच्छता | घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या व्यवस्थापनामुळे शहर राहिले चकाचक  
Palakhi Sohala 2024 | पालखी सोहळ्यात वारकऱ्यांसाठी आवश्यक सुविधांचे नियोजन करा- उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

Palkahi Sohala 2024 | पालखी मार्गांवर वारकरी यांना सुविधा उपलब्ध करून देण्याचे महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना आदेश | पालखी मार्गांची अधिकाऱ्या सोबत आयुक्तांची पाहणी

 

Palakhi Sohala 2024 – (The Karbhari News Service) – श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे आगमन पुणे शहरात रविवार, ३० जून रोजी होत आहे. या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेच्या वतीने पालखी मार्गांची जागा पाहणी आयोजित करण्यात आली होती. (Pune Municipal Corporation (PMC)

येरवडा कळस धानोरी क्षेत्रीय कार्यालय, औंध – बाणेर क्षेत्रिय कार्यालय, भवानी पेठ क्षेत्रिय कार्यालय, हडपसर क्षेत्रिय कार्यालय या ठिकाणच्या सुसज्ज आपत्ती व्यवस्थापन कक्ष नियोजनाबाबत रस्ते दुरूस्ती, अतिक्रमण, मुक्कामाच्या ठिकाणाची सुरक्षितता, पाणीपुरवठा, स्वच्छतागृहे, आरोग्यविषयक सेवा याबाबत सोयी- सुविधा उपलब्ध करणे, पावसाळी गटारे, चेंबर्स दुरुस्त करणेबाबत व स्वच्छता विषयक कामे करणेसंबंधी  प्रशासक तथा आयुक्त, यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. (Dr Rajendra Bhosale IAS)

 

जागा पाहणीस मा. डॉ. राजेन्द्र भोसले, प्रशासक तथा आयुक्त पृथ्वीराज बीपी, अति महा. आयुक्त (ई), संदीप कदम, उपायुक्त (घनकचरा विभाग), अनिरुध्द पावसकर, मुख्य अभियंता (पथ विभाग ), नंदकिशोर जगताप, मुख्य अभियंता (पथ विभाग ), मा. गणेश सोनुने, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी,  दिनकर गोजारे, अधिक्षक अभियंता ( मलनिःसारण देखभाल व दुरुस्ती विभाग), साहेबराव दांडगे, अधिक्षक अभियंता (पथ विभाग ), अशोक घोरपडे, मुख्य उद्यान अधिक्षक,  किशोरी शिंदे, उपायुक्त (परिमंडळ क्र. १ ), मा. अविनाश सकपाळ, उपायुक्त (परिमंडळ क्र. ५) मा. कल्पना बळीवंत, प्र. मुख्य आरोग्य अधिकारी,  चंद्रसेन नागटिळक, सहाय्यक महापालिका आयुक्त ( येरवडा कळस धानोरी क्षेत्रिय कार्यालय), गिरीश दपकेकर, सहाय्यक महापालिका आयुक्त ( औंध बाणेर क्षेत्रिय कार्यालय), रवि खंदारे, सहाय्यक महापालिका आयुक्त (शिवाजीनगर घोले रोड क्षेत्रिय कार्यालय), अस्मिता तांबे, सहाय्यक महापालिका आयुक्त (भवानी पेठ क्षेत्रिय कार्यालय), आणि क्षेत्रीय कार्यालयातील संबंधित अधिकारी व श्री संत ज्ञानेश्वर व श्री संत तुकाराम महाराज संस्थांचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.

श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी मार्गाची जागा पाहणीमध्ये खालील विषयावर चर्चा होऊन संबंधितांना पालखीचे स्वागतप्रसंगी करावयाचे नियोजनाबाबत आदेश देण्यात आले.

मलनिःसारण विभागास म्हस्के वस्ती, कळस येथील नाल्यावरील कल्व्हर्टची
साफसफाई करण्यास तसेच नाल्यांची खोली वाढविण्याचे आदेश देण्यात आले. पालखी मार्गावरील सर्व चेंबर्स तपासून चेंबर्सवर लोखंडी जाळी बसविणे, पावसाळी पाईप तपासून त्यासंबंधित कामे तातडीने करण्याचे सूचित करण्यात आले.

पुणे शहरातील पावसाळी चेंबर्सवरील कचरा त्याभागातील संबंधित सफाई
कर्मचाऱ्यांकडून काढण्याची व्यवस्था संबंधित क्षेत्रीय कार्यालयामार्फत करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

वारकऱ्यांच्या आरोग्यासाठी सर्व परिसराची २४ तास स्वच्छता ठेवण्याबाबत
सांगण्यात आले. घनकचरा विभागास स्वच्छतेसंबंधी सर्व सुविधा पुरविण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत.

विद्युत व्यवस्था खंडीत होणार नाही याबाबत संबंधितांना सुचना करण्यात आल्या आहेत. तसेच पालखी मार्गावर पुरेशी प्रकाश व्यवस्था करण्यास सांगण्यात आले.
रस्त्यावरील बेवारस गाड्या तसेच अडगळीच्या वस्तू उचलणे व त्याची विल्हेवाट लावणे.
पालखी मार्गावर ठिकठिकाणी वारकऱ्यांसाठी विसावा/ आराम कक्षदेखील उभारण्याची व्यवस्था करण्याबाबत आदेशित करण्यात आले. सदर दोन्ही कक्षामध्ये वारकऱ्यांसाठी, स्वच्छ पिण्याचे पाणी, मोबाईल टॉयलेट्स, इमर्जन्सी मेडिकल युनिट इत्यादी गोष्टींची व्यवस्था करण्यात येईल. त्याचबरोबर ठिकठिकाणी वारकऱ्यांचे आरोग्यविषयक सेवा  उपलब्ध होणेकामी फिरते दवाखान्यांनी व्यवस्था करण्याबाबत आदेशित करण्यात आले.
वाहतूक पोलीसांमार्फत वाहतूक सुरळीत राहावी तसेच पालखी दिंडी सोहळ्यास वाहतुकीचा अडथळा होणार नाही याची काळजी घेण्याबाबत सूचना केल्या.
पथ विभागाच्या माध्यमातून पदपथ व रस्ते यांची डागडुजी करून घेणेस सांगितले आहे. त्याच बरोबर रस्त्यालगतच्या सिमाभिंती स्वच्छ करण्यात येणार आहेत. पालखी मार्गात अडथळा येणाऱ्या झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्यात येणार आहे.
विसाव्याच्या ठिकाणी पालखीचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची गर्दी आणि गैरसोय होऊ नये याकरिता पालखी दर्शन व्यवस्था व बॅरिकेडस बाबत संबंधितांना आदेश दिले. त्याचबरोबर विसाव्याच्या ठिकाणी प्रसादाची व्यवस्था करताना आपत्तीजन्य परिस्थिती उद्भवू नये याकरिता अग्निशमनविषयक सुविधा देण्यास सांगितले आहे.
पालखी मार्गावर वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या टपऱ्या, अतिक्रमणे काढण्याची कार्यवाही अतिक्रमण विभाग व बहुद्देशीय पथक यांचेमार्फत पुर्ण करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे.
पालखी सोहळ्यानिमित्त पाणीपुरवठा विभागाकडून पालखी मार्ग व पालखी तसेच दिंड्यांच्या मुक्कामांची ठिकाणे विचारात घेऊन पालखी मार्गावर व सर्व पेठांमध्ये पाणीपुरवठा करण्यात येत असून, देखभाल दुरुस्तीकामी २४ तास दुरूस्ती यंत्रणा ठेवण्यात येणार आहे.
संचेती चौक, विश्रांतवाडी चौक परिसर पालखी मार्ग, एफ सी रोड, अलका टॉकीज चौक याठिकाणी मोबाईल टॉयलेट्सची आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याबाबत संस्थानांच्या प्रतिनिधींनी सूचना केली.
 तसेच ज्या ठिकाणी मंडळामार्फत वारकऱ्यांना जेवण / नाश्ता देण्यात येतो त्या ठिकाणीही स्वच्छता राहावी यासाठी पुरेसे कचरा वेचक सेवक उपस्थित ठेवण्यात येणार आहे. तसेच त्या ठिकाणी स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
पालखी मुक्कामाच्या परिसरातील सार्वजनिक शौचालये दुरूस्ती पुर्ण करण्यात येणार असून विविध ठिकाणी मोबाईल टॉयलेट्सची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच ज्या दिंड्या मनपाच्या शाळांमध्ये मुक्कामी असतात त्या ठिकाणी पाणीपुरवठा, शौचालये उपलब्ध करण्याबाबत आदेशित करण्यात आले.
आरोग्य विभागाकडून पालखी पूर्वी पालखी मार्गावर तसेच सर्व शाळांमध्ये औषध फवारणी करण्याबाबत सूचना देण्यात आली. तसेच घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत स्वच्छता करण्यात येणार असून फिरती शौचालये ठेवणेत येणार आहेत. तसेच सार्वजनिक स्वच्छता गृहे स्वच्छ व दुरुस्ती करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे.