Mahavikas Aghadi Vs BJP | भाजप सरकारने जनतेची फसवणुक केली |  महाविका‌स आघाडीचा आरोप

HomeपुणेBreaking News

Mahavikas Aghadi Vs BJP | भाजप सरकारने जनतेची फसवणुक केली |  महाविका‌स आघाडीचा आरोप

गणेश मुळे Apr 19, 2024 2:10 PM

Pune Lok Sabha By-election | पुणे लोकसभा पोटनिवडणूक | आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता तरीही अजित पवारांना का हवीय पुण्याची जागा? 
Pune Congress : Agitation Against Governor : राज्यपालांच्या वादग्रस्त विधानाच्या निषेधार्थ शहर काँग्रेसतर्फे ‘‘जोडो मारो आंदोलन’’‌
Congress Pune | केंद्रातील मोदी सरकार सर्वसामान्यांचे नसून केवळ हम दो हमारे दो चे – अरविंद शिंदे

Mahavikas Aghadi Vs BJP | भाजप सरकारने जनतेची फसवणुक केली |  महाविका‌स आघाडीचा आरोप

 

 

Mahavikas Aghadi Vs BJP – (The karbhari News Service) – मागील दहा वर्षाच्या सत्ता काळात भाजप सरकारने इलेक्ट्रोल बॉन्डनोटबंदी या माधमातून मोठा भ्रष्टाचार केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप नेत्यांनी मोठमोठ्या घोषणा केल्या मात्र त्या पूर्ण केल्या नाहीत. घोषणा करून जनतेला फसवणाऱ्या भाजपच्या पायाखालची वाळू आता घसरू लागली आहेत्यामुळे पुणे लोकसभा मतदार संघाच्या बाहेरील उमेदवार एमआयएम व वंचितच्या माध्यमातून उभे करण्यात आलेअसा आरोप महाविकास आघाडीतील प्रमुख पक्षांच्या शहराध्यक्षांनी केला.

 

महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी काँग्रेस भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदेराष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगतापशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहरप्रमुख गजानन थरकुडेमाजी महापौर कमल व्यवहारेमाजी नगरसेवक रफीक शेखअजित दरेकर उपस्थित होते.

 

अरविंद शिंदे म्हणालेभाजपने इलेक्ट्रोल बॉन्ड आणि नोटबंदीच्या माध्यमातून मोठा भ्रष्टाचार केला आहे. विरोधकांवर बोलणारे भाजप नेते या दोन विषयांवर शब्द काढत नाहीत. जे पंतप्रधान दहा वर्षात‌ पत्रकारांना उत्तर देवू शकले नाहीतमग‌ ते जनतेला काय खरे बोलणार. दहा वर्ष जनतेला फसवणारे भाजप आज विकासाच्या नाही तर प्रभू श्रीरामाच्या नावाने मते मागत आहे. पुण्याचे उमेदवारही रामाचे नाव घेवून मते मागत आहेत. मात्र पुणेकर व देशातील सर्व मतदार या निवडणुकीत राम मंदिरावर नाही तर विकासावर मतदान करतील. भाजपच्या पायाखालची वाळू घसरत आहे. त्यामुळे भाजपने वंचित व एमआयएमला निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. ते‌ कसे उभे‌ केले हे त्यांनात माहित. यांना पुणे मतदार‌संघात उमेदवार मिळाला नाहीम्हणून दोन्ही उमेदवार शिरुर मतदार संघातून आयात केले. या दोन पक्षाला मत म्हणजे भाजपला मतहे दलित आणि मुस्लिम समाजाला कळून चुकले आहे‌. त्यामुळे या निवडणुकीत मतदान करताना पुणेकर महागाईबेरोजगारी व शहरातील ढासळलेला कायदा‌ व सुव्यवस्थेचा डोळ्यासमोर ठेवून धंगेकर यांना निवडून देतीलअशा विश्वास‌ शिंदे यांनी व्यक्त केला.

 

 

प्रशांत जगताप म्हणालेभाजपचे जे उमेदवार आहेत ते महापालिकेत स्थायी‌ समिती अध्यक्ष होतेमहापौर होते. या काळात त्यांनी पुणेकरांचे प्रश्न सोडवण्यापेक्षा वेगवेगळ्या टेंडरमध्येच लक्ष घातले.   भाजपने समान पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून डोळ्यात धुळफेक‌ केली आहे. विविध योजनेच्या नावाखाली पुणेकरांना फसवण्याचे काम केले आहे. आता निवडणुकीच्या काळात महायुतीला शहरात मुळशी पॅटर्न आणायचा आहेअसेही‌ते म्हणाले.

 

गजानन थरकुडे म्हणालेभाजपने कोथरुडमधून पालकमंत्रीखासदार दिले. कोथरूडला सत्ताकेंद्र केले. तरीही कोथरुडचा विकास झाला नाही. कोथरुडचा जो विकास‌ झाला तो माजी मंत्री शशिकांत सुतार यांच्याच काळात झाला. चंद्रकांत पाटील पालकमंत्री असताना काय कामे केली त्यातील केवळ चार कामे त्यांनी सांगावीत. विकासाचे गाजर दाखवून निवडणुक लढवली जात आहे. सुनेला पाठवा दिल्लीत लेकीला ठेवा गल्लीत अशी डॉ. निलम गोऱ्हे यांच्या टिकेचा समाचार घेताना थरकुडे म्हणालेगोऱ्हे यांना स्वत:ला नगरसेवक म्हणून निवडून येता‌येत नाहीना त्या एक नगरसेवक निवडून आणू शकत नाहीत. तरीही शिवसेनेने त्यांना गेल्या २० ते २२ वर्षे विधान परिषदेच्या आमदार केले.