Pune Congress | पुणे काँग्रेसची दर सोमवारी साप्ताहिक बैठक होणार | निवडणुकी बाबत होणार चर्चा  | शहर अध्यक्ष अरविंद शिंदे यांची माहिती

HomeपुणेBreaking News

Pune Congress | पुणे काँग्रेसची दर सोमवारी साप्ताहिक बैठक होणार | निवडणुकी बाबत होणार चर्चा  | शहर अध्यक्ष अरविंद शिंदे यांची माहिती

Ganesh Kumar Mule Jul 06, 2023 3:30 PM

PMC Employees Transfer | महसुली अथवा महत्वाच्या खात्यात एकतर्फी बदल्या करण्यात येऊ नयेत  | अरविंद शिंदे, चंदुशेठ कदम यांचा विधी समितीत प्रस्ताव 
PMC Employees Transfer | एका खात्यात ३ वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेल्या 40% अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या त्वरित करा
Pune Loksabha 2024 | Sunil Devdhar | पुणे लोकसभेसाठी भाजपकडून सुनील देवधर यांच्या नावाची चर्चा!

Pune Congress | पुणे काँग्रेसची दर सोमवारी साप्ताहिक बैठक होणार | निवडणुकी बाबत होणार चर्चा

| शहर अध्यक्ष अरविंद शिंदे यांची माहिती

 

    Pune Congress |  पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे (City President Arvind Shinde) यांनी आज काँग्रेस भवन येथे जाहिर केले की, पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आठवड्याच्या प्रत्येक सोमवारी सायं. ४.०० वा., काँग्रेस भवन, शिवाजीनगर, पुणे येथे साप्ताहिक बैठकीचे (Weekly Meeting) आयोजन केले जाणार आहे. (Pune Congress)

     या बैठकीस काँग्रेसचे आजी माजी आमदार, प्रदेश पदाधिकारी व प्रतिनिधी, आजी माजी नगरसेवक, ब्लॉक अध्यक्ष, विविध विभाग व सेलचे अध्यक्ष, महिला, युवक , विद्यार्थी संघटना आदी या बैठकीस उपस्थित राहणार आहेत. त्यानुसार पहिली बैठक सोमवार १० जुलै रोजी सायं. ४.०० वा., काँग्रेस भवन येथे आयोजित करण्यात आली आहे. (Pune Congress Weekly Meeting)

या  बैठकीत आगामी लोकसभा, विधानसभा व पुणे महानगरपालिका निवडणुकी संदर्भात चर्चा विनिमय होणार आहे. अशी माहिती पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी या पत्रकाद्वारे दिली आहे. (Pune Congress News)


News Title |Pune Congress | Pune Congress will hold a weekly meeting every Monday There will be a discussion about the election | City President Arvind Shinde’s information