Pune Rain News | खडकवासला धरण साखळीत एका रात्रीत २.३६ टीएमसीने वाढ | गेल्या २४ तासांत ३.७५ टीएमसीने वाढ

Homeadministrative

Pune Rain News | खडकवासला धरण साखळीत एका रात्रीत २.३६ टीएमसीने वाढ | गेल्या २४ तासांत ३.७५ टीएमसीने वाढ

Ganesh Kumar Mule Jul 07, 2026 8:45 AM

Khadakwasla Dam Chain | Pune Rain Update | खडकवासला मधून पाण्याचा विसर्ग सोडला जात नाही तोपर्यंत शहरात पाणीकपात सुरूच राहण्याची शक्यता!
Khadakwasla Dam Chain | खडकवासला धरण साखळीच्या पाणीसाठ्यात वाढ २४ तासांत १.८४ टीएमसीने वाढ 
Khadakwasla Dam Chain | खडकवासला धरण साखळीतील चारही धरणे १००% भरली |चारही धरणातून एकाच वेळी विसर्ग

Pune Rain News | खडकवासला धरण साखळीत एका रात्रीत २.३६ टीएमसीने वाढ | गेल्या २४ तासांत ३.७५ टीएमसीने वाढ

| चारही धरणे ३६.६३% भरली; गेल्या २४ तासांत ३७८५ दशलक्ष घनफूट आवक

 

Khadakwasla Dam Chain – (The Karbhari News Service) – खडकवासला धरण परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या *खडकवासला धरण साखळीतील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. केवळ एका रात्रीत साठा ८.३२ टीएमसीवरून १०.६८ टीएमसी झाला आहे. (Pune Rain)

काल सकाळी हा साठा ६.९३ टीएमसी होता. म्हणजेच गेल्या २४ तासांत ३.७५ टीएमसीने वाढ झाली असून, प्रशासनासाठी आणि पुणेकरांसाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे.

धरणनिहाय आकडेवारी – ७ जुलै, सकाळी ६ वाजता

1) खडकवासला धरण
– *२४ तासातील पाऊस*: १० मिमी
– *एकूण पाऊस*: ३०४ मिमी
– *पाणीसाठा*: १.२४ टीएमसी – *६२.९२%*
– *आवक*: +८७८ क्यूसेक
– *पाणीपातळी*: ५८०.८६ मीटर
– *विसर्ग*: सांडव्यातून ० टीएमसी
– *पाणीपुरवठा*: PMC ला ४२२ क्यूसेक

*2) पानशेत धरण*
– *२४ तासातील पाऊस*: २५८ मिमी
– *एकूण पाऊस*: ७५१ मिमी
– *पाणीसाठा*: ४.२० टीएमसी – *३९.४१%*
– *आवक*: +११६१ क्यूसेक
– *पाणीपातळी*: ६२१.१५ मीटर

*3) वरसगाव धरण*
– *२४ तासातील पाऊस*: २४० मिमी
– *एकूण पाऊस*: ७११ मिमी
– *पाणीसाठा*: ४.६२ टीएमसी – *३६.०५%*
– *आवक*: +१४३५ क्यूसेक
– *पाणीपातळी*: ६२३.३५ मीटर

*4) टेमघर धरण*
– *२४ तासातील पाऊस*: १९ मिमी
– *एकूण पाऊस*: ८३४ मिमी
– *पाणीसाठा*: ०.६२ टीएमसी – *१६.६७%*
– *आवक*: +३१ क्यूसेक
– *पाणीपातळी*: ६७८.१० मीटर

*एकूण स्थिती*
चारही धरणांमधील *एकूण आवक: ३७८५ दशलक्ष घनफूट*
*एकूण पाणीसाठा: १०.६८ टीएमसी – ३६.६३%*

*गेल्या वर्षीच्या तुलनेत*
गेल्या वर्षी याच दिवशी चारही धरणांमध्ये *१९.०८ टीएमसी म्हणजे ६५.४६%* पाणीसाठा होता. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत साठा अजूनही कमी आहे. मात्र, गेल्या २ दिवसांत झालेल्या पावसामुळे साठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे.

*प्रशासनाची माहिती*
सध्या कोणत्याही धरणातून सांडव्यातून विसर्ग सुरू नाही. धरण क्षेत्रात पाऊस सुरूच असल्याने जलसंपदा विभागाकडून पाणीपातळीवर २४ तास लक्ष ठेवण्यात येत आहे. पाणीसाठ्यातील ही वाढ लक्षात घेऊन *पुणे शहरातील पाणीकपातही ७ जुलैपासून ५ दिवसांसाठी स्थगित* करण्यात आली आहे.

पुढील २४ तास हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे धरणांतील साठ्यात आणखी वाढ होण्याची अपेक्षा आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: