J P Nadda on GBS | जी बी एस संसर्गजन्य नाही | केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांची माहिती
| पुणे शहरातील परिस्थिती लवकरच पूर्ववत होण्याचा वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी व्यक्त केला विश्वास
Union Health Minister on GBS – (The Karbhari news Service) – महाराष्ट्रात विशेष करून पुणे शहरात जी बी एस रुगाणची (GBS Patient in Pune) संख्या वाढत आहे. मात्र हा आजार संसर्गजन्य नाही, यामुळे परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. तसेच राज्यात या आजारांवर लागणारी औषधे पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याचे केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा (Health Minister J P Nadda) यांनी आज झालेल्या ऑनलाइन बैठकीत सांगितले. (GB Syndrome)
यावेळी केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव, महाराष्ट्रचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ आदीसाह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी सविस्तर आढावा घेत विविध विभागाच्या अधिकाऱ्यांना महत्वपूर्ण सूचना केल्या, यामध्ये ज्या ठिकाणी जी बी एस रुग्ण संख्या वाढत आहेत त्या भागात प्रत्यक्ष पहाणी करण्यात यावी, कुकुट पालन व्यावसाय असलेल्या परिसराला भेटी द्याव्यात. पाणी पुरवठा आणि शुद्धीकरण विभागाने विशेष जलशुद्धीकरण मोहीम राबवावी, ज्या ठिकाणी पाईप लाइन दुरुस्तीची गरज असेल तिथे ती तत्काल करण्यात यावी, तसेच मागील दोन महिन्यातील पाणी पुरवठा आणि आरोग्य विषयक बाबींचा आढावा घ्यावा असे निर्देश प्रशासनाला दिले.
तसेच सर्व रुग्णालयांनी शासनाने ठरवून दिलेल्या एस ओ पी चे पालन करावे असे सांगत रुग्णांना फिजिओ थेरेपी सोबतच मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी सल्ला देण्याच्या सूचना जे पी नड्डा यांनी दिला.
बैठकीबद्दल माहिती देताना वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्या, पुण्यातील जी बी एस रुगाणबद्दलची इत्यंभूत माहिती आम्ही केंद्र सरकारला दिली आहे. राज्यातील जी बी एस परिस्थितीवर आमचे पूर्ण लक्ष असून पुणे महानगर पालिका आणि राज्य सरकार समन्वय साधून ह्या साठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करत आहेत.
COMMENTS