Guillain Barre Syndrome In Pune | GBS चे पुण्यात २४ रुग्ण! | ८ रुग्ण अतिदक्षता विभागात

Homeadministrative

Guillain Barre Syndrome In Pune | GBS चे पुण्यात २४ रुग्ण! | ८ रुग्ण अतिदक्षता विभागात

Ganesh Kumar Mule Jan 21, 2025 8:39 PM

PMC Health Department | तर क्षेत्रीय वैद्यकीय अधिकाऱ्यांवर केली जाणार कारवाई | आरोग्य प्रमुखांचा इशारा
Mahatma Gandhi Punyatithi | उद्या (३० जानेवारी) शहरात कुणीही पशुहत्या करू नये | महापालिका आरोग्य विभागाचे जाहीर आवाहन
PMC CHS | पुणे महापालिका कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी | CHS योजनेबाबत महापालिका कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी दिलासा! 

Guillain Barre Syndrome In Pune | GBS चे पुण्यात २४ रुग्ण! | ८ रुग्ण अतिदक्षता विभागात

| आजाराचे विश्लेषण करण्यासाठी शिघ्रकृती दलाची ( Rapid Response Team) स्थापना

 

GB Syndrome – (The Karbhari News Service) – Guillain Barre Syndrome चे पुण्यात २४ रुग्ण आढळून  आले आहेत. यातील ७ रुग्ण हे अतिदक्षता विभागात आहेत. दरम्यान या आजाराचे विश्लेषण करण्यासाठी शिघ्रकृती दलाची ( Rapid Response Team) स्थापना करण्यात आली आहे. अशी माहिती महापालिका आरोग्य विभागाच्या प्रमुख डॉ निना बोराडे (Dr Nina Borade PMC) यांनी दिली आहे. (PMC Health Department)

Guillain Barre Syndrome आजारामध्ये बाधित रुग्णांची प्रतिकारशक्ती मज्जातंतूवर आघात केल्याने सदर आजार संभावतो. सदर आजाराची लागण सर्वसाधारणतः सर्व वयोगटातील व्यक्ती यांना होते. सदर आजाराचे अत्यल्प रुग्णांमध्ये गंभीर स्वरूपाची लक्षणे आढळून येतात.

Guillain Barre Syndrome आजाराचे सर्वसाधारण लक्षणे पुढीलप्रमाणे:-

१) हातापायातील ताकद कमी होणे.
२) हातापायाला मुंग्या (tingling sensations) देणे.
३) गिळण्यास व बोलणेस त्रास होणे.
४) धाप लागणे/ श्वास घेण्यास त्रास होणे.

पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रात आजमितीस २४ रुग्ण आढळले आहेत. त्यातील What १० रूग्ण हे दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, सह्याद्री हॉस्पिटल (डेक्कन) १, भारती हॉस्पिटल ३, काशीबाई नवले हॉस्पिटल ४, पुना हॉस्पिटल ५ आणि अंकुर हॉस्पिटल औंध १ असे २४ रुग्ण आढळले आहेत.
(Guillain Barre Syndrome)

रुग्णांपैकी काशीबाई नवले हॉस्पिटल येथील १ व भारती हॉस्पिटल येथील १ असे एकूण २ रुग्ण Ventilator वर असून एकूण २४ रुग्णांपैकी ८ रुग्ण अतिदक्षता विभागामध्ये उपचार घेत आहेत. असे डडॉ बोराडे यांनी सांगितले.
——

पुणे महानगरपालिका, आरोग्य विभागामार्फत समक्ष भेट देऊन सर्व्हेक्षण सुरु करण्यात आले आहे. तसेच संशयीत ८ रुग्णांचे रक्त व लघवी नमुना नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (NIV) येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. तसेच पाण्याचे नमुने देखील तपासणीसाठी पाठविले आहे.  राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी, वै. जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील तज्ञ डॉक्टर्स, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी ( NIV) येथील तज्ञ, पुणे महानगरपालिकेचे आरोग्याधिकारी व स्वयंसेवी संस्था (PATH) यांच्या सहभागाने या आजाराचे विश्लेषण करणेकरिता शिघ्रकृती दलाची ( Rapid Response Team) स्थापना करण्यात आली आहे.  प्रकरणी महाराष्ट्र शासनाकडील आरोग्य विभागाशी समन्वय साधून त्यांचे मार्गदर्शनानुसार पुणे महानगरपालिकेकडून प्रतिबंधात्मक कार्यवाही सुरु करण्यात आली आहे.

डॉ. निना बोराडे, आरोग्य अधिकारी 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0