Guillain Barre Syndrome In Pune | पुण्यात GBS रुग्णांची संख्या ६७ वर ! | १३ रुग्ण वेंटीलेटर वर
| सार्वजनिक आरोग्य विभागाची माहिती
GB Syndrome – (The Karbhari News Service) – Guillain Barre Syndrome रुग्णांची संख्या पुण्यात ६७ वर पोचली आहे. यातील १३ रुग्ण हे वेंटीलेटर वर आहेत. दरम्यान या आजाराचे विश्लेषण करण्यासाठी शिघ्रकृती दलाची ( Rapid Response Team) स्थापना करण्यात आली होती. त्यांच्या विश्लेषण नुसार हा जलजन्य आजार (Water Borne Diseases) असल्याचे समोर आले आहे. (GBS Bacteria)
एकुण ६७ रुग्ण, यापैकी ३९ रुग्ण पुणे ग्रामीण, १३ रुग्ण पुणे मनपा, १२ रुग्ण पिंपरी चिंचवड मनपा व ३ रुग्ण इतर जिल्हयातील आहेत. त्यापैकी ४३ पुरुष व २४ महिला आहेत. यापैकी १३ रुग्ण व्हेन्टीलेटरवर आहेत.
वय व लिंगानुसार रुग्णांचा तपशिल
• आजाराची सर्वसाधारण लक्षणे-
अ) अचानक पायातील किंवा हातात येणारी कमजोरी / लकवा
ब) अचानकपणे उद्भवलेले चालण्यातील त्रास किवा कमजोरी.
क) डायरिया (जास्त दिवसांचा)]
आतापर्यंत केलेल्या उपाययोजना
> राज्यस्तरावरील शीघ्र प्रतिसाद पथकाने बाधित भागाला त्वरीत भेट दिली.
> पुणे मनपा व जिल्हयाला बाधित भागामध्ये सर्व्हेक्षण सुरु करण्याच्या सुचना देण्यात आलेल्या आहेत. रुग्णांचे शौच नमुने रक्तनमुने राष्ट्रीय विषाणु संस्था पुणे येथे तपासण्यासाठी पाठविण्यात आले आहेत. शहराच्या विविध भागातील पाणीनमुने रासायनिक व जैविक तपासाणीसाठी राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा यांच्याकडे पाठविण्यात आले आहेत.
> आरोग्य शिक्षण करण्यासाठी सुचना देण्यात आल्या आहेत.
> खाजगी वैदयकीय व्यवसायिकांना आव्हान करण्यात आले आहे की जीबीएस रुग्ण आढळुन आल्यास त्वरीत शासकीय आरोग्य यंत्रणा यांना कळवावे.
→ नागरिकांनी घाबरुन जाण्याची अवश्यकता नसुन आरोग्य विभागाची प्रतिबंधात्मक उपाययोजनाबाबत तयारी आहे.
नागरीकांनी घ्यावयाची काळजी
अ) पिण्याचे पाणी दुषित राहणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. उदा. पाणी उकळून घेणे.
ब) अन्न स्वच्छ आणि ताजे असावे.
क) वैयक्तिक स्वच्छतेवर भर देण्यात यावा.
(ड) शिजलेले अन्न आणि न शिजलेले अन्न एकञित न ठेवल्यास सुध्दा संसर्ग टाळता येईल.
COMMENTS