PMC Employees on Indore Tour |  पुणे महापालिकेचे १०० सफाई कर्मचारी अभ्यास दौऱ्यासाठी निघाले इंदौरला!

Homeadministrative

PMC Employees on Indore Tour |  पुणे महापालिकेचे १०० सफाई कर्मचारी अभ्यास दौऱ्यासाठी निघाले इंदौरला!

Ganesh Kumar Mule Feb 03, 2025 9:26 PM

BJP Pune | Bhide Wada Smarak | ऐतिहासिक भिडे वाड्याचे रुपांतर लवकरच राष्ट्रीय स्मारकात होणार, भाजपाकडून साखर वाटून आनंदोत्सव
Mahatma Gandhi | Lal Bahadur Shastri Jayanti | गांधीजी आणि शास्त्रीजी च्या जयंतीनिमित्त कसबा मतदार संघात १८६९ तुळस व गुलाब रोप वाटप
Shailesh Tilak | शैलेश टिळक यांनी भूमिका केली स्पष्ट| आता भाजप काय निर्णय घेणार?

PMC Employees on Indore Tour |  पुणे महापालिकेचे १०० सफाई कर्मचारी अभ्यास दौऱ्यासाठी निघाले इंदौरला!

|  “स्वच्छ, सुंदर आणि विकसित कसब्या” साठी क्लीनसिटी इंदौरचा अभ्यास दौरा

 

Kasba Constituency – (The Karbhari News Service) – कसबा विधानसभा मतदारसंघात (Kasba Constituency) आमदार हेमंत रासने (MLA Hemant Rasane) यांच्या संकल्पनेतून ‘स्वच्छ, सुंदर आणि विकसित कसबा’ अभियान राबवण्यात येत आहे. अभियाना अंतर्गत गेली सात वर्षांपासून स्वच्छ सर्वेक्षणात पहिल्या क्रमांकवर असणाऱ्या क्लीनसिटी इंदौरचा (Indore) अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला आहे. आपल्या शहराची स्वच्छता करण्यामध्ये महत्वाची भूमिका निभावणाऱ्या १०० पेक्षा जास्त सफाई कर्मचाऱ्यांचा या दौऱ्यामध्ये समावेश असणार आहे. पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येने पुणे महापालिकेचे सफाई कर्मचारी अभ्यास दौऱ्यासाठी राज्याबाहेर जाणार आहेत. (PMC Employees)

पुणे शहराचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक केंद्र असणारा असणारा कसबा भारतातील सर्वात स्वच्छ आणि सुंदर मतदारसंघ बनवण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून आमदार हेमंत रासने यांच्या संकल्पनेतून ‘स्वच्छ, सुंदर आणि विकसित कसबा’ हे अभियान राबवले जात आहे. २३ नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर दोनच दिवसांत पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी व इतर अधिकाऱ्यांना सोबत घेत संपूर्ण मतदारसंघात पाहणी दौरा केला. पाहणी दौऱ्यानंतर तात्काळ कार्यवाही करत भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत येणारे १४ क्रॉनिक स्पॉट, तसेच कसबा – विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत येणारे १८ पैकी १० क्रॉनिक स्पॉट पूर्णपणे बंद करण्यात आले असून अंशत सुरू असणारे ८ क्रॉनिक स्पॉट देखील बंद करण्याची कार्यवाही सुरु आहे. या भागामध्ये दररोज सकाळी आणि संध्याकाळी असे दोन वेळा कचरा संकलन केले जात आहे. घंटागाड्यांची संख्या देखील वाढवण्यात आली आहे.

कचरा टाकण्यात येणारे क्रॉनिक स्पॉट बंद करण्यात आल्यानंतर नागरिकांमध्ये जनजागृती करणे तसेच अभियानाचा पुढील नियोजनबध्द आराखडा तयार करण्यासाठी गेली सात वर्षांपासून स्वच्छ सर्वेक्षणात पहिला क्रमांकवर असणाऱ्या क्लीनसिटी इंदौरचा अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकतीच मुंबईमध्ये राज्यातील नवनिर्वाचित आमदारांसाठीची मार्गदर्शन बैठक पार पडली. यावेळी त्यांनी लोकप्रतिनिधींनी आपल्या मतदारसंघात सर्वोत्तम विकासकामे करण्यासाठी अभ्यास दौरे करण्याचा सल्ला दिला होता. हाच आदर्श डोळ्यासमोर ठेऊन कसबा मतदारसंघात ‘स्वच्छ, सुंदर आणि विकसित कसबा’ अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी स्वच्छतेचे रोलमॉडेल असणाऱ्या इंदौरचा तीन दिवसीय अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला असल्याचं हेमंत रासने म्हणाले.

याबद्दल बोलताना हेमंत रासने म्हणाले, “भारतातील सर्वात सुंदर विधानसभा मतदारसंघ करण्याचे स्वप्न बाळगून विधानसभा निकाल लागल्यानंतर पहिल्या दिवसापासून काम करत आहे. याचाच भाग म्हणून क्लीन सिटी इंदौरचा अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला आहे. इंदौरसह बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणाऱ्या उज्जैनचा देखील दौऱ्यामध्ये समावेश आहे, येथील धार्मिक स्थळांच्या विकासाचे मॉडेल आपल्याकडे राबवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. राज्यातील महायुती सरकारकडून देखील कचरामुक्त कसबा अभियानाला पाठबळ मिळत असून नुकतेच मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेऊन अभियानाची संपूर्ण माहिती दिली. यावेळी सविस्तर चर्चा झाल्यानंतर त्यांनी पाठिंबा दर्शवत शासनाकडून आवश्यक सहकार्य करण्याचा शब्द दिला आहे.”

असा असणार इंदौर अभ्यास दौरा

दिनांक ५ फेब्रुवारी ते ७ फेब्रुवारी दरम्यान इंदौर अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले असून पुणे महानगरपालिकेचे अधिकारी, सफाई कर्मचारी, भाजपाचे स्थानिक कार्यकर्ते, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, गणेश मंडळ कार्यकर्ते, शाळांमधील शिक्षक, पत्रकार अशा सुमारे ३०० जणांचा सहभाग असणार आहे. इंदौर शहरातील कचरा प्रक्रिया प्रकल्प तसेच प्रत्यक्षात नियोजनबद्धपणे करण्यात येणारे कचरा संकलन याची पाहणी केली जाणार आहे. इंदोर स्मार्ट सिटीच्या प्रमुख श्रीमती श्रद्धा तोमर यावेळी सर्वांना मार्गदर्शन करणार आहेत. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव हे काही दिवसांपूर्वी पुणे दौऱ्यावर असताना आमदार हेमंत रासने यांनी त्यांची भेट घेत इंदोर दौऱ्यासाठी सहकार्य करण्याची विनंती केली होती. श्री यादव यांनी केलेल्या सूचनेनुसार इंदोर नगर निगमचे आयुक्त शिवम वर्मा यांच्याकडून सहकार्य मिळत आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0