Pune PMC Retirement | सप्टेंबर महिन्यात पुणे महापालिकेचे 47 अधिकारी आणि कर्मचारी सेवानिवृत्त!

Homeadministrative

Pune PMC Retirement | सप्टेंबर महिन्यात पुणे महापालिकेचे 47 अधिकारी आणि कर्मचारी सेवानिवृत्त!

Ganesh Kumar Mule Oct 01, 2025 9:17 AM

Retired Employees Notional Increment | 30 जूनला सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना 1 जुलै ची काल्पनिक वेतनवाढ | पुणे महापालिका मागवणार राज्य सरकारचे मार्गदर्शन
PM Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे महाराष्ट्रातील 11,200 कोटी रुपयांहून जास्त किमतीच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि राष्ट्रार्पण | जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या पुणे मेट्रो विभागाचे केले उद्घाटन
GBS In Pune | GBS या साथीच्या रोगाबाबत महानगरपालिके कडून पुणेकरांना देण्यात येणारी मदत न थांबवण्याची मागणी 

Pune PMC Retirement | सप्टेंबर महिन्यात पुणे महापालिकेचे 47 अधिकारी आणि कर्मचारी सेवानिवृत्त!

 

PMC Retired Employees – (The Karbhari News Service) – सप्टेंबर, 2025 महिन्यात पुणे महापालिकेचे (Pune Municipal Corporation) 47 अधिकारी आणि कर्मचारी सेवानिवृत्त झाले. या कर्मचाऱ्यांसाठी महानगपालिका कामगार कल्याण विभागाच्या (PMC Labour Welfare Department) वतीने सेवापूर्ती समारंभ आयोजित करण्यात आला होता. (PMC Pune)

या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. वैभव पाटील, कार्यकारी संचालक, सिल्व्हर बर्च मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, धायरी,पुणे, अस्लम वजीर पटेल, महापालिका सहाय्यकआयुक्त,  संजय शाहूराव मोहिते, कार्यकारी अभियंता हे उपस्थित होते. नितीन केंजळे, मुख्य कामगार अधिकारी (Nitin Kenjale PMC) यांनी कार्यक्रमाच्या प्रस्तावनेवर बोलताना सेवापुर्ती समारंभाची पार्श्वभूमी सांगून सेवकांच्या भविष्यात मिळणाऱ्या रकमा, गुंतवणूक व नियोजन याची सविस्तर माहिती दिली. तसेच कोणत्याही सेवकास काही अडचण आल्यास त्यांनी कामगार कल्याण विभागास भेट द्यावी, असे आवाहन केले व सर्वाना भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
सेवानिवृत्त होणारे अधिकारी अस्लम पटेल, .संजय मोहिते यांनी पुणे महानगरपालिकेत केलेल्या सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करून पुणे महानगरपालिकेचे आभार मानले व सर्वांना शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ.पाटील यांनी तसेच सर्व सेवकांनी आपल्याला मिळणाऱ्या वेळेचे नियोजन करावे. आपले आरोग्य सांभाळावे जेणेकरून आपल्याला गोळ्या औषधे खाण्याची वेळ येऊ नये. आपण नेहमी आनंदाने कामे केली पाहिजेत, कामात व्यस्त राहिले पाहिजे, कुटुंबाला वेळ दिला पाहिजे, असे नमूद करून पुणे महानगरपालिकेच्या सीएचएस योजनेचा लाभ घ्यावा अशी योजना दुसऱ्या कोणत्याही ठिकाणी नाही. ही योजना खुप सुंदर आहे, असे सूचित करून सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

प्रमुख पाहुण्यांच्या मार्गदर्शनानंतर सर्व सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचारी यांना शॉल व स्मृतिचिन्ह देवून गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल कदम व नियोजन महेश मुंडलिक यांनी केले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: