Chhaava Trailer | छावा चित्रपटाच्या ट्रेलर वरून शिवप्रेमी नाराज! | चुकीचे प्रसंग वगळण्याची मागणी!
Chhaava Movie – ( The Karbhari News Service) – दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांचा बहुचर्चित छावा या चित्रपटाचा ट्रेलर २२ जानेवारीला प्रदर्शित झाला आहे. यात विकी कौशल आणि रश्मिका हे प्रमुख भूमिकेत आहेत. मात्र चित्रपटातील काही प्रसंगावरून शिवप्रेमी नाराज आहेत. त्यामुळे हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. (Chhaava Movie)
आगामी हिंदी छावा चित्रपटातील छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनातील चुकीच्या व खोट्या प्रसंगांना मराठा समाजाचा तीव्र विरोध आहे. विकी कौशल यांच्या आगामी हिंदी चित्रपटांमध्ये छत्रपती संभाजी महाराज व येसूबाई यांच्या बद्दल आक्षेपार्ह प्रसंग दाखवण्यात आले आहेत. असे शिवप्रेमी सांगत आहेत.
——
जगाच्या पाठीवर छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव राजे आहेत, ज्यांच्या दरबारात स्त्री अथवा नर्तकी नाचली नाही. अशा राजांच्या राज्याभिषेक सोहळ्यात युवराज संभाजी राजे नाचताना दाखवले आहेत. तसेच महाराणी येसूबाई या देखील चित्रपटात नृत्य करताना दाखवले आहेत. या दोन्ही गोष्टी आक्षेपार्ह असून चित्रपटाच्या निर्मात्यांनी त्वरित हे दोन्ही प्रसंग चित्रपटातून वगळावे अन्यथा मराठा समाज व शिवप्रेमी हा चित्रपट महाराष्ट्रात कुठेही प्रदर्शित होऊन देणार नाही.
सचिन आडेकर, समन्वयक मराठा क्रांती मोर्चा पुणे शहर. माजी अध्यक्ष मराठा सेवा संघ पुणे शहर
COMMENTS