कर्मचाऱ्यांच्या बोनसला मुख्य सभेची मंजुरी
: 5 वर्षाचा होणार करार
: बोनस वाढवून देण्याची विरोधी पक्षाची मागणी
पुणे: पुणे महानगरपालिकेतील सर्व अधिकारी व कर्मचारी यांना दिवाळीच्या मुहूर्तावर सानुग्रह अनुदान अर्थात बोनस देण्यात येतो. सद्य स्थितीत 5 वर्षाचा करार संपलेला आहे. त्याबाबत सर्व अधिकारी व कर्मचारी यांना सन २०२०- २१ ते २०२४-२५ या ५ आर्थिक वर्षाकरीता सानुग्रह अनुदान अधिक जादा रक्कम आदा करणेबाबत संघटनेने मागणी केलेली होती. त्यानुसार मागील बुधवारच्या पक्षनेत्यांच्या बैठकीत याबाबत चर्चा झाली. त्यामध्ये हा करार मान्य करण्यात आला.त्यानंतर स्थायी समितीत देखील हा प्रस्ताव मान्य करण्यात आला. त्यानंतर आज हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी मुख्य सभेसमोर ठेवण्यात आला होता. त्याला ही मान्यता देण्यात आली. कर्मचाऱ्यांना 8.33% अनुदान आणि पहिल्या वर्षी 17 हजाराची ज्यादा रक्कम देण्यात येईल. ही ज्यादा रक्कम प्रति वर्षी 2 हजार रुपयाने वाढवण्यात येईल. शिवाय सर्व कर्मचाऱ्यांना या वर्षी करता 3 हजाराचा कोविड प्रोत्साहन भत्ता अदा करण्याचा निर्णय बैठकीत झाला. यामुळे कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. याशिवाय pmp च्या कर्मचाऱ्यांना देखील दिवाळी पूर्वी बोनस देण्याचा निर्णय घेण्यात आला.
: 5 वर्षाच्या करारावर मुहर
पुणे महानगरपलिकेतील सर्व अधिकारी व कर्मचारी सेवक (रोजंदारी कामगारांसह) तसेच माध्यमिक व तात्रिक
शिक्षण विभागातील शिक्षक, शिक्षकेतर सेवकांना (शिक्षण सेवकांसह) आणि पुणे महानगरपालिका शिक्षण
मंडळाकडील शिक्षक व शिक्षकेतर सेवकांना (बालवाडी शिक्षिका व सेवकांसह) तसेच महानगरपालिकेच्या
कामास नेमण्यात आलेल्या कंत्राटी व एकवट वेतनावर काम करणाऱ्या सेवकांना, ज्यांचे वेतन महानगरपालिका
निधीतुन अदा करण्यात येते त्या सर्वांना सन २०२०-२१ ते सन २०२४-२५ या पाच आर्थिक वर्षातील सुधारित वेतन संरचनामधील मूळ वेतन + ग्रेड पे + महागाई भत्ता या एकुण रकमेच्या ८.३३ टक्के अधिक जादा रकम प्रत्येक वर्षी अनुक्रमे १७,०००, १९,०००, २१,०००, २३,०००, २५,००० इतकी एकुण रकम सानुग्रह अनुदानापोटी दिवाळीपुर्वी दोन आठवडे मान्यताप्राप्त युनियन बरोबर करार करून देण्यात यावी. अशी मागणी कर्मचारी संघटनेने केली होती. त्यानुसार याबाबत पक्षनेत्यांच्या बैठकीत चर्चा झाली होती. त्यामध्ये हा करार मान्य करण्यात आला होता. कर्मचाऱ्यांना 8.33% अनुदान आणि पहिल्या वर्षी 17 हजाराची ज्यादा रक्कम देण्यात येईल. ही ज्यादा रक्कम प्रति वर्षी 2 हजार रुपयाने वाढवण्यात येईल. शिवाय सर्व कर्मचाऱ्यांना या वर्षी करता 3 हजाराचा कोविड प्रोत्साहन भत्ता अदा करण्याचा निर्णय बैठकीत झाला होता. हाप्रस्ताव स्थायी समितीच्या माध्यमातून मुख्य सभेसमोर ठेवण्यात आला होता. त्यावर मुख्य सभेने देखील मुहर लावली आहे.
: pmp कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी बोनस
दरम्यान मुख्य सभेत हा बोनस वाढवून देण्याची मागणी विरोधी पक्षाच्या अरविंद शिंदे, अविनाश बागवे, प्रशांत जगताप, बाबुराव चांदेरे, वसंत मोरे यांनी केली. मात्र सत्ताधारी पक्षाने त्याला विरोध केला. त्यांनतर प्रशांत जगताप यांनी pmp च्या कर्मचाऱ्यांना बोनस देण्याची मागणी केली. त्यावर सत्ताधाऱ्यांनी आश्वस्त केले कि त्या कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी बोनस देण्यात येईल..
—
COMMENTS