PMC : शहरात गुरुवारी पाणी बंद! 

HomeBreaking Newsपुणे

PMC : शहरात गुरुवारी पाणी बंद! 

Ganesh Kumar Mule Oct 18, 2021 1:49 PM

Pune Municipal Corporation | पुणे महापालिकेत फसवणुकीचा नवा फंडा!
PMC Helpline | आता पाण्याबाबतच्या तक्रारी करा 24 तास | महापालिकेकडून 1 मार्च पासून हेल्पलाईनची सुविधा
Video clip Dispute : आमदार सुनील कांबळे यांचा खुलासा : पोलिसात तक्रार दाखल

शहरात गुरुवारी पाणी बंद!

: शुक्रवारी देखील कमी दाबाने पाणीपुरवठा 

 

: दुरुस्तीमुळे बंद राहतील जलकेंद्र 

पुणे. पर्वती जलकेंद्र, लश्कर जलकेंद्र, वडगांव जलकेंद्र, एसएनडीटी, होळकर, भामा आसखेड जलकेंद्रामध्ये गुरुवारी २१ ऑक्टोबर ला दुरुस्तीची कामे केली जातील. त्यामुळे गुरुवारी पूर्ण शहराचा पाणी पुरवठा बंद राहील. शुक्रवारी देखील कमी दाबाने पाणी पुरवठा होईल. असे महापालिका प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

– पाणी पुरवठा बंद असणारा भाग 

पर्वती जलकेंद्र : शहरातील सर्व पेठा, दत्तवाड़ी परिसर, राजेंद्र नगर, लोकमान्य नगर, डेक्कन परिसर, शिवाजी नगर परिसर, स्वारगेट परिसर, पर्वती दर्शन, पर्वती गांव, सहकार नगर, सातारा रोड़ परिसर, पद्मावती, बिबवेवाडी, तळजाई, कात्रज, धनकवडी, गुलाबनगर.
– वडगांव जलकेंद्र : हिंगणे, आनंदनगर, वडगांव, धायरी, आंबेगांव पठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ परिसर, कोंढवा बुद्रुक.
– एनएसएनडीटी जलकेंद्र : भुसारी कॉलनी, धनंजय सोसाइटी, एकलव्य कॉलेज परिसर, महात्मा सोसायटी, गुरु गणेश नगर, यूनिवर्सिटी परिसर, वारजे हाई वे परिसर, वारजे माळवाडी परिसर, रामनगर, अहिरेगांव, पॉप्युलर नगर, अतुल नगर, शाहू कॉलोनी, औंध, बावधन, सूस रोड़, सुतारवाड़ी, भूगांव रोड़ परिसर.
– नवीन होळकर पंप : विद्यानगर, टिंगरे नगर, कलस, धानोरी, लोहगांव, विश्रांतवाडी, विमाननगर, नगर रोड़ परिसर.
– लश्कर जलकेंद्र : लश्कर इलाके, पुणे स्टेशन परिसर, मुळा रोड़, कोरेगांव पार्क, ताड़ीवाला रोड़, रेसकोर्स परिसर, वानवडी, कोंढवा, हडपसर, वानवडी, मोहम्मदवाडी, कालेपडल, मुंढवा, येरवडा, कल्याणी नगर, नगर रोड़, वडगांवशेरी, चंदन नगर, खराडी, सोलापुर रोड़, गोंधले नगर.

– होळकर व चिखली भाग  – विद्या नगर, विमान नगर, टिंगरे नगर, कलस, धानोरी, विश्रांतवाड़ी, लोहगांव, नगर रोड़ परिसर. 
– भामा आसखेड जलकेंद्र – लोहगाव, विमाननगर, वडगावशेरी, कल्याणी नगर, विश्रांतवाडी, फुलेनगर, येरवडा.
——

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0