Baner Fire Station | बाणेरमध्ये अग्निशामक केंद्र सुरु | अमोल बालवडकर यांचा पाठपुरावा 

Homeadministrative

Baner Fire Station | बाणेरमध्ये अग्निशामक केंद्र सुरु | अमोल बालवडकर यांचा पाठपुरावा 

Ganesh Kumar Mule Jul 05, 2025 7:10 PM

Amol Balwadkar : सलग पाचव्या वर्षी अमोल बालवडकर यांनी दिवाळी केली गोड !
Sus, Mhalunge Water Issue | सुस, म्हाळुंगे गावांचा पाणी प्रश्न सुटणार! 26 कोटींचा येणार खर्च
Amol Balwadkar Foundation | अमोल बालवडकर फाउंडेशनच्या ‘मंगळागौर’ आणि ‘लकी ड्रॉ’ स्पर्धेस उस्फुर्त प्रतिसाद

Baner Fire Station | बाणेरमध्ये अग्निशामक केंद्र सुरु | अमोल बालवडकर यांचा पाठपुरावा

 

Baner Balewadi News – (The Karbhari News Service) – बाणेर-बालेवाडी परिसरातील नागरिकांसाठी एक दिलासादायक आणि अत्यंत गरजेची फायर स्टेशन सुविधा अखेर सुरू झाली आहे. या सुविधेच्या उभारणीचा लढा २०१५ पासून संघर्ष यात्रेच्या माध्यमातून सुरू करण्यात आला होता आणि आज त्या दीर्घकालीन संघर्षाला यश आले आहे. आज या फायर स्टेशनची पाहणी केली. अशी माहिती माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी दिली. (PMC Fire Brigade)

या भागातील वाढती लोकसंख्या, उंच इमारतींची संख्या आणि आपत्ती अथवा अपघाताच्या वाढत्या शक्यता लक्षात घेता, फायर स्टेशन ही प्राथमिक आणि अपरिहार्य गरज होती. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ही सुविधा अत्यावश्यक होती.

२०१८-१९ मध्ये प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात झाली आणि दीड वर्षांपूर्वीच हे काम पूर्णत्वास आले होते. मात्र प्रशासकीय पातळीवरील विलंबामुळे सुविधा सुरू होण्यास वेळ लागला.

या संदर्भात २४ डिसेंबर २०२४ रोजी महापालिका आयुक्तांची भेट घेऊन फायर स्टेशन तातडीने सुरू करण्याची ठाम मागणी केली होती. त्यानंतर संबंधित विभागांमार्फत त्वरीत कार्यवाही झाल्यानंतर अखेर ही सुविधा सुरू करण्यात आली.

यामध्ये विशेष म्हणजे, अत्याधुनिक अशा उंच शिडीच्या २ अग्निशामक गाड्या (फायर व्हेईकल्स), तसेच अधिकारी व कर्मचारीवर्ग यांचीही पूर्ण उपलब्धता प्रशासनाने करून दिली आहे.

ही केवळ एक सेवा सुविधा नाही, तर बाणेर-बालेवाडी परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा एक मजबूत आधार आहे. हा लढा, ही यशोगाथा म्हणजे संघर्ष यात्रा, नागरिकांचा सक्रिय सहभाग आणि भारतीय जनता पार्टीच्या पाठिंब्याने साधलेले सामूहिक यश आहे.

आज बाणेर अग्निशमन केंद्र येथे दिलेल्या भेटीप्रसंगी केंद्रप्रमुख शिवाजी मेमाणे, प्रभारी अधिकारी प्रमोद मरळ, तांडेल गणेश शिंदे, फायरमन सागर ठोंबरे, महेश गारगोटे, ज्ञानेश्वर गायकवाड, अजित बिचकुले, ऋषिकेश जरे, विशाल गेंगजे, प्रणित ईलपाते, सुमित गाजरे, अक्षय गायकवाड, राजन भालचिम, श्रीजीत सस्कर, आकाश मेंगडे आदी उपस्थित होते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: