Flag Day Fund  Deduction | महापालिका कर्मचारी ध्वजदिन निधी संकलनात लावणार हातभार

HomeBreaking Newsपुणे

Flag Day Fund Deduction | महापालिका कर्मचारी ध्वजदिन निधी संकलनात लावणार हातभार

गणेश मुळे May 31, 2024 6:19 AM

Pune PMC Canteen | महापालिका कर्मचाऱ्यांना लवकरच मिळणार हक्काचे उपहार गृह! | पीएमसी एम्प्लॉईज युनियन च्या मागणीला यश | सेवकांसाठी असणाऱ्या उपहारगृहास आयुक्तांची मान्यता 
Pune PMC Officers | संदीप खलाटे यांचे पुनर्वसन; तर एका प्रशासन अधिकाऱ्याला सहाय्यक आयुक्त पदाचा दर्जा! | महापालिका आयुक्तांच्या निर्णयाने कर्मचारी वर्गाला दिलासा
Covid Center : Ravindra Binwade : कोविड सेंटर मध्ये काम करणारे कर्मचारी कार्यमुक्त!  : आपल्या मूळ खात्यात रुजू होण्याचे अतिरिक्त आयुक्तांचे निर्देश 

Flag Day Fund  Deduction | महापालिका कर्मचारी ध्वजदिन निधी संकलनात लावणार हातभार

| पगारातून दिली जाणार रक्कम

Flag Day Fund – (The Karbhari News Service) – जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या (Pune Jilha Sainik Kalyan Karyalay) वतीने ध्वजदिन निधी (Flag Day Fund) संकलित करण्यात येतो. या निधी संकलनात महापालिका कर्मचारी (PMC Employees) देखील हातभार लावत असतात. त्यानुसार कर्मचाऱ्यांच्या मे पेड इन जून च्या वेतनातून हा निधी कापला जाणार आहे. महापालिका अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे (Ravindra Binwade IAS) यांनी याबाबत नुकतेच परिपत्रक जारी केले आहे. (Pune Municipal Corporation (PMC)

युद्धात, देशांतर्गत सुरक्षा संबंधी मोहिमेत तसेच चकमकीत धारातीर्थी पडलेल्या शूर वीरांच्या वीरपत्नी, वीरमाता, पिता, अपंग सैनिक व त्यांचे कुटुंबिय यांना आर्थिक मदत देण्यासाठी तसेच माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणार्थ आणि पुनर्वसनाचे विविध योजना राबविण्यासाठी या निधीची आवश्यकता असते. माजी सैनिकांच्या कल्याणकारी योजना राबविण्यासाठी संपूर्ण भारतात ७ डिसेंबर हा ध्वजदिन म्हणून पाळण्यात येतो. त्याकरिता प्रत्येक वर्षी ध्वजदिन निधी जमा
करण्यात येतो.

जिल्हाधिकारी व अध्यक्ष, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, पुणे यांनी सशस्त्र सेना ध्वजदिन, २०२३ चे निधी संकलनाचे आवाहन केले आहे. आवाहनानुसार सर्व महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी यांचे वेतनातून खालीलप्रमाणे निधी कपात करणे आवश्यक आहे. त्यानुसार माहे पेड इन जून च्या वेतनातून हा निधी कापला जाणार आहे. हे राष्ट्रीय कर्तव्य असल्याने अधिकारी / कर्मचारी व सर्व कामगार संघटनांनी वेतनातून निधी कपात करणेस विरोध करू नये. असे आवाहन अतिरिक्त आयुक्तांनी केले आहे. अतिरिक्त आयुक्तांनी पुढे म्हटले आहे कि, मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली कोष कार्यालयाने जमा रकमेचा दफ्तरी हुकुम काढून  जिल्हाधिकारी व अध्यक्ष, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, पुणे (Collector & President Zilla Sainik Welfare Office, pune) यांचे नावे धनादेश काढावा.

असा निधी कापला जाणार 

वर्ग 1 – 400 रु.
वर्ग 2 – 350 रु.
वर्ग 3 – 250 रु.
वर्ग 4 – 150 रु.