PMC Employees Transfer | गेल्या काही महिन्यांपासून रखडलेल्या बदल्यांना अखेर मिळाला मुहूर्त | महापालिका कर्मचाऱ्यांनी टाकला सुटकेचा निश्वास! 

HomeBreaking News

PMC Employees Transfer | गेल्या काही महिन्यांपासून रखडलेल्या बदल्यांना अखेर मिळाला मुहूर्त | महापालिका कर्मचाऱ्यांनी टाकला सुटकेचा निश्वास! 

Ganesh Kumar Mule Aug 23, 2024 9:42 PM

12 MLAs appointed to Legislative Council | राज्यपालांच्या निर्णयाविरोधात याचिका
PMC Employees | Strike | सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मनपा कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून काम सुरु! | क्षेत्रीय कार्यालय स्तरावरून चांगला प्रतिसाद
Railway Ticket Discount | भाजपची रेल्वेतही नफेखोरी | माजी आमदार मोहन जोशी यांचा आरोप 

PMC Employees Transfer | गेल्या काही महिन्यांपासून रखडलेल्या बदल्यांना अखेर मिळाला मुहूर्त | महापालिका कर्मचाऱ्यांनी टाकला सुटकेचा निश्वास!

 

Pune Municipal Corporation – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेतील (PMC Pune) वरिष्ठ लिपिक पासून ते कनिष्ठ अभियंता पदाच्या बदल्या गेल्या काही महिन्यांपासून रखडलेल्या होत्या. समुपदेशन होऊन देखील आयुक्तांची स्वाक्षरी न झाल्याने बदल्या होत नव्हत्या. त्यामुळे आता बदल्या होतील कि नाही, अशी शंका महापालिका कर्मचाऱ्यांना होती. मात्र शुक्रवारी संध्याकाळी बदल्यांच्या ऑर्डर जारी करण्यात आल्या आहेत. यामुळे कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. (Pune PMC News)

महापालिकेतील वरिष्ठ लिपिक पदाच्या बदल्या २०१७ सालापासून प्रलंबित होत्या. तसेच कनिष्ठ अभियंता आदी पदाच्या नियतकालिक बदल्या देखील प्रलंबित होत्या. कर्मचाऱ्यांनी वारंवार मागणी केल्याने प्रशासनाने बदल्या करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार अतिरिक्त आयुक्त यांच्या अध्यक्षते खाली समुपदेशन करण्यात आले. सगळी प्रक्रिया पार झालेली असताना देखील बदल्यांच्या ऑर्डर वर महापालिका आयुक्तांची स्वाक्षरी झाली नव्हती. शहरात आलेला पूर, त्यानंतर लाडकी बहीण योजनेचे काम, यामुळे प्रशासन या विषयात लक्ष घालू शकले नव्हते. त्यामुळे कर्मचाऱ्यांची अशी धारणा झाली होती की या बदल्या रद्द केल्या जाणार. मात्र शुक्रवारी बदल्यांच्या ऑर्डर जारी झाल्या आहेत.

कर्मचारी पद आणि कर्मचारी संख्या

वरिष्ठ लिपिक : ९९

उप अधिक्षक : ८

कार्यकारी अभियंता (स्थापत्य) : १०

कार्यकारी अभियंता (विद्युत) : २

उप अभियंता (विद्युत) : ३

कनिष्ठ अभियंता (स्थापत्य): २

उप अभियंता (स्थापत्य) : ९

कार्यकारी अभियंता (यांत्रिकी) : २

उप अभियंता (स्थापत्य) :१

कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य) : ६६

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0