E-Waste Collection | कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालय आयोजित ई – कचरा संकलन उपक्रमास नागरिकांचा उदंड प्रतिसाद

Homeadministrative

E-Waste Collection | कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालय आयोजित ई – कचरा संकलन उपक्रमास नागरिकांचा उदंड प्रतिसाद

Ganesh Kumar Mule Apr 19, 2026 2:55 PM

First Waste-to-Hydrogen Plant in India |  PMC Seeking Fund from Central and State gov for Hydrogen Plant
First waste to Hydrogen plant in India | पुणे महापालिका प्रायोगिक तत्त्वावर ०.६ टन हायड्रोजन ची करणार निर्मिती! 
Green Hydrogen Policy | PMC Pune | हरित हायड्रोजन धोरणा बाबत राज्य सरकारने पुणे महापालिकेकडून मागवला अभिप्राय!

E-Waste Collection | कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालय आयोजित ई – कचरा संकलन उपक्रमास नागरिकांचा उदंड प्रतिसाद

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – “स्वच्छ भारत अभियान स्वच्छ सर्वेक्षण मिशन – २०२६, व स्वच्छता पूर्व पुरस्कार” या उपक्रमाच्या अनुषंगाने कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालय घनकचरा व्यवस्थापन व स्वच्छ सहकारी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने प्रभाग क्रमांक १०, ११, ३१ मधील सर्व आरोग्य कोठीच्या अंतर्गत ई कचरा जमा करण्याचा उपक्रम राबविण्यात आला. (PMC Kothrud Bavdhan ward Office)

उपक्रम डहाणूकर कॉलनी सर्कल, मयूर कॉलनी, रामबाग कॉलनी, सुतारदरा, मोरे विद्यालय, कोथरूड गावठाण, परमहंस नगर, भुसारी कॉलनी, गाढवे कॉलनी, गुजरात कॉलनी इत्यादी परिसरात १० ठिकाणी ई कचरा संकलन केंद्र उभा करण्यात आले होते. ही संकलन उपक्रमाद्वारे नागरिकांच्या घरातील अडगळीचे साहित्य तसेच इलेक्ट्रॉनिक कचरा मोठ्या प्रमाणात जमा करण्यात आला. सदर संकलन केंद्रावर नागरिकांनी आपल्या घरातील ई कचरा, जुने कपडे, चपला, लॅपटॉप, टीव्ही, संगणक, बंद पडलेले मोबाईल, चार्जर, वायर, ओव्हन, घड्याळे, हिटर, जुने पुस्तके, वह्या, प्लॅस्टिक वस्तू व खेळणी अशा अनेक प्रकारच्या वस्तूंचे संकलन करण्यात आले.

ई कचरा संकलन केंद्रावर डहाणूकर कॉलनीतील ज्येष्ठ नागरिक धर्मराज शिंदे, जनसेवक बाळासाहेब दांडेकर, व्यापारी संघाचे कोथरूड अध्यक्ष शशिकांत उभे यांनी आपल्या घरातील अडगळीचे साहित्य आणून जमा करून या उपक्रमाचे कौतुक केले. सर्व केंद्रावरील एकूण २८९ नागरिकांनी आपल्या घरातील ई-कचरा जमा करून उदंड प्रतिसाद दिला. सर्व संकलन केंद्रावर १० लैपटॉप, ५ टिव्ही संच, ७ संगणक, ६५ किलो चार्चर व वापर ५८० किलो जुने कपडे, २०७ किलो चप्पलं व बुट, ३९० किलो फ्लॅस्टिक व खेळणी १८० किलो रद्दी, ५८५ किलो टिव्ही व संगणक, १४० किलो जुने रेडिओ व घड्याळे ३२०जुने गिझर, ३७० जुने भांडी, १३० किलो जुने मोबाईल असे एकूण २,९६७ किलो ई कचरा संकलन करण्यात आला. सदर संकलन केलेला ई कचरा पुनर्वापर किंवा पुन:चक्रीकरण करणे तसेच वापरा योग्य असणारे जुने कपडे गरीब कुटुंबातील व्यक्तींना दिले जाते.

उपक्रम घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त अविनाश सकपाळ, परिमंडळ कार्यालय क्रमांक २ चे उपायुक्त संतोष वारुळे, महापालिका सहाय्यक आयुक्त सुहास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ आरोग्य निरीक्षक राम सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य निरीक्षक करण कुंभार, किरण जाधव, राजेश आहेर, दत्तात्रय दळवी, गणेश साठे, प्रमोद चव्हाण, गणेश चौधरी, लक्ष्मीकांत कुलकर्णी, सचिन सावंत, निसार शेख, जया सांगडे यांच्या निरीक्षणाखाली मोकादम वैजीनाथ गायकवाड, आण्णा ढावरे, परेश कुचेकर, कुणाल जाधव यांनी परिश्रम केले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: