BJP Vs Congress in PMC GB  | महिला आरक्षण विधेयकावरून भाजप-काँग्रेस मुख्य सभेत आमने-सामने

Homeadministrative

BJP Vs Congress in PMC GB  | महिला आरक्षण विधेयकावरून भाजप-काँग्रेस मुख्य सभेत आमने-सामने

Ganesh Kumar Mule Apr 20, 2026 7:09 PM

Kasba by-election | कसब्याच्या पराभवाचे मूल्यमापन; योग्य ती कारवाई करू | देवेंद्र फडणवीस
Hemant Rasane :PMC : Standing committee chairmen : हेमंत रासने यांनी पक्ष आणि पक्षातील महत्वाच्या नेत्याबद्दल व्यक्त केली कृतज्ञता 
Prashant Jagtap | Pune Rain | नालेसफाई घोटाळा झाला नसल्याचे सिद्ध करून दाखवा | प्रशांत जगताप यांचे देवेंद्र फडणवीस यांना आव्हान

BJP Vs Congress in PMC GB  | महिला आरक्षण विधेयकावरून भाजप-काँग्रेस मुख्य सभेत आमने-सामने

| सभागृहात दोन्ही पक्षांकडून जोरदार घोषणाबाजी

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे पुणे महापालिकेच्या मुख्य सभेत महिला आरक्षण विधेयकावरून भाजप आणि काँग्रेस आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले. यावेळी दोन्ही पक्षांनी मुख्य सभेत जोरदार घोषणाबाजी केली. (PMC General Body Meeting)

महिला आरक्षण विधेयक संसदेत नामंजूर करण्यात आले. भाजपने यावरून काँग्रेस ला लक्ष्य केले आहे. देश आणि राज्यभरात विविध ठिकाणी भाजपाचे नेते पत्रकार परिषद घेऊन काँग्रेस वर या विषयावरून टीका करत आहेत. याचे पडसाद पुणे महापालिकेच्या मुख्य सभेत देखील पाहायला मिळाले.

सोमवारची मुख्य सभा सुरू होताच भाजपच्या सर्व नगरसेविका महापौरांच्या डायससमोर आल्या आणि त्यांनी काँग्रेस विरोधात जोरदार घोषणा द्यायला सुरुवात केली. काँग्रेस महिला विरोधी, कॉंग्रेस चा धिक्कार असो, अशा घोषणांनी सभागृह दणाणून गेले. भाजपच्या नगरसेविकांचा हा आक्रमकपणा पाहून मग काँग्रेस चे सर्व नगरसेवक देखील समोर येऊन घोषणा देऊ लागले. यामध्ये अरविंद शिंदे, चंदू कदम, प्रशांत जगताप अशा सर्व नगरसेवकांचा समावेश होत. भाजपा महिलांना फसवत आहे, अशा घोषणा काँग्रेस च्या नगरसेवकांनी द्यायला सुरुवात केली. काँग्रेस चे नगरसेवक घोषणा देत असलेले पाहून मग भाजपाचे देखील सर्व नगरसेवक महापौरांच्या डायस समोर आले आणि काँग्रेस विरोधात घोषणा देऊ लागले. यात सभागृह नेते, स्थायी समिती अध्यक्ष यांचा देखील समावेश होता. दोन्ही पक्ष एकमेकांवर आरोप करत घोषणाबाजी करू लागले. यामुळे काही काळ सभागृहाचे वातावरण चांगलेच तापलेले दिसून आले. शेवटी यात महापौर मंजूषा नागपुरे यांनी हस्तक्षेप करत सर्वांना खाली बसवले.

 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: